Blast in Lahore: भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत (Opration Sindhoor) पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. काल (7 मे) मध्यरात्री 1.05 वाजताच्या सुमारास भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. भारतीय लष्कराकडून 15 दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. 

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान सावरला नसताना आज सकाळी लाहोरमध्ये तीन मोठे स्फोट (Blast in Lahore) झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान, आज (8 मे) पाकिस्तानातील लाहोरमधील वॉल्टन विमानतळ, गोपाल नगर आणि नसराबाद भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. बचाव आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सलग तीन बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटानंतर पाकिस्तानकडून हालचालींना वेग आला आहे. नेमका स्फोट का झालाय?, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये हालचाली वाढल्या-

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानकडून ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर जमवाजमव सुरु आहे. पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत.  लाहोरमध्ये 'नोटीस टू एअर मिशन' जारी करण्यात आली आहे. लाहोरकडे जाणारी-येणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. तसेच सीमावर्ती भागातली पाकमधली गावंही रिकामी करण्यात आली आहेत. 

एका व्यक्तीने जागतिक समुदायाचं विशेष लक्ष वेधलं-

पाकिस्तानातील मुरीदके फुटबॉल स्टेडियममध्ये पोलीस आणि सैन्याच्या सुरक्षेत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांची अंत्ययात्रा काल काढण्यात आली. पाकिस्तानी लष्कराचे अनेक बडे अधिकारी या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते. त्यात एका व्यक्तीने जागतिक समुदायाचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. शवपेट्यांपुढे नमाज पढणारा हा कोणी धर्मगुरू नव्हता तर तो होता लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ...लष्कराचे अधिकारी या दहशतवादी रौफच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

China On Operation Sindoor: भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...

Iran On India And Pakistan: दक्षिण आशियातील भारताचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या इराणचं पाकिस्तानमधून मोठं विधान; परराष्ट्रमंत्री म्हणाले...