Celebs Reaction On Operation Sindoor: भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी तळांवर हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याच्या पराक्रमानंतर देशभरात आनंदाची लाट पसरली. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अनेक सिने कलाकार देखील भारतीय सैन्य आणि भारत सरकारचं कौतुक करत आहेत आणि त्यांचा अभिमान बाळगत आहेत. बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अजय देवगणपासून (Ajay Devgn) ते विवेक ओबेरॉयपर्यंत सर्वांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अजय देवगणनं इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केलीय. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, "आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि आपल्या भारतीय सैन्याला सलाम. भारत अभिमानानं उभा आहे आणि मजबूत आहे. जय हिंद!" त्यासोबतच, "आयुष्मान खुरानानंही तिरंग्याचा इमोजी पोस्ट केला आणि लिहिलंय की, "या जगात दहशतवादाला स्थान नाही.", तर अक्षय कुमारनंही ट्विटरवर पोस्ट केलीय. त्यानं लिहिलंय की, "जय हिंद, जय महाकाल."

'ऑपरेशन सिंदूर' म्हणजे, भारतातील विधवांच्या अश्रूंचा बदला... 

विवेक ओबेरॉयनंही 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात एक लांबलचक पोस्ट शेअर केलीय. त्यांनं लिहिलंय की, "दहशतवादाला वर्चस्व गाजवू दिलं जाणार नाही, भारताचा आत्मा आणि ऊर्जा पुन्हा शक्ती मिळविण्यासाठी आणि आपल्या पवित्र भूमीवर असा अंधार पुन्हा कधीही पसरू नये, याची खात्री करण्यासाठी वाढत राहील. जगानं दहशतवादाच्या दुष्टतेविरुद्ध एकत्र आलं पाहिजे. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रचाराला आपण बळी पडू नये, हे कोणत्याही धर्माविरुद्ध किंवा राष्ट्राविरुद्धचं युद्ध नाही, तर ते दहशतवादाविरुद्धचं युद्ध आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे भारतातील विधवांच्या अश्रूंचा बदला आहे आणि दहशतवाद्यांना त्यांच्या दुष्कृत्यांसाठी आता सोडलं जाणार नाही, असा कडक इशारा आहे." 

सुनील शेट्टी, विक्की कौशल यांनीही दिली प्रतिक्रिया 

सुनील शेट्टी यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, "दहशतवादाला स्थान नाही. शून्य सहनशीलता. पूर्ण न्याय. 'ऑपरेशन सिंदूर'. तर, विक्की कौशलनं त्याच्या इंस्टा स्टोरीवर तिरंग्याचा फोटो पोस्ट केलाय आणि लिहिलंय की, "जय हिंद, जय सेना." आणि त्यासोबतच त्यानं 'ऑपरेशन सिंदूर' हा हॅशटॅग वापरला आहे.

"आम्ही आमच्या देशासोबत आहोत..."

अभिनेता राजकुमार रावनंही 'ऑपरेशन सिंदूर'वर गर्व व्यक्त केला आहे. हिदुस्तान टाईम्सशी बोलताना अभिनेता म्हणाला की, "अर्थात आम्ही आमच्या सशस्त्र दलांसोबत उभे आहोत, आम्ही आमच्या देशासोबत उभे आहोत. आमचं सरकार जे काही निर्णय घेतंय, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, आम्ही त्यात सहभागी आहोत, कारण जे घडलंय, ते घडायला नको होतं. (पहलगाम दहशतवादी हल्ला). यामुळे आम्हा सर्वांना खूप राग आला आणि खूप दुःखही झालं. तर मला वाटतं, हो, आपण एक राष्ट्र म्हणून पूर्णपणे एकत्र आहोत आणि आपल्या सशस्त्र दलांचा खूप अभिमान आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Operation Sindoor Prediction in Ranveer Allahbadia Podcast: रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये आधीच केलेलं 'ऑपरेशन सिंदूर'चं भाकीत; स्वामी यो म्हणालेले...