बुलडाणा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होत असल्याने अनोखं आंदोलन छेडलं आहे. तहसीलदारांना पिठलं भाकर पाठवून शासनाचा निषेध केला आहे. पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची शासनाने थट्टा चालवली आहे. कोणत्याही शेतकऱ्यापर्यंत शासनाची मदत पोहोचलेली नाही. विदर्भ व मराठवाड्यातील लाखो नुकसानग्रस्त शेतकर्यांची नावे मदतीच्या यादीमध्ये आलेले नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, असे वारंवार म्हटले. परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. दिवाळी हा सण गोड-धोड खाण्याचा व खाऊ घालण्याचा सण आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी सरकारच्या नाकर्तेपणामुळे काळी दिवाळी ठरल आहे. याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार यांच्यामार्फत बेसन भाकर पाठवून शासनाचा निषेध केला आहे.
काही मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्या मागण्या पुढीलप्रमाणे,
- महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी सततचा पाऊस व पुरामुळे झालेल्या शेती व पिकाचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना 25000 व बागा येथील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत सरसकट सर्व शेतकर्यांना देण्यात यावी.
- मेहकर तालुक्यातील नादुरुस्त झालेले ट्रांसफार्मर 24 तासात देण्यात येऊन कृषिपंपांना मुबलक व सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा.
- केंद्राच्या एमएसपी कायद्यान्वये 18 प्रकारच्या भरड धान्याची हमीभावाने तसेच कापसाच्या मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र सुरू करून दिवाळीतही खरेदी सुरू ठेवावे.
- यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अशक्य असल्याने सरसकट सर्व शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात यावी.
- हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची महाराष्ट्र शासनाने बदललेले निकष अन्यायकारक असून विमा कंपन्यांच्या फायद्याचे असल्याने संत्रा केळी व इतर फळबागांच्या विम्याचे बदललेले निकष रद्द करून 2018 -19 निकाल कायम करण्यात यावे.
- किसान क्रेडिट कार्ड ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी.
- कृषी पंपाचे सर्व पॅड पेंटिंग कनेक्शन तातडीने देण्यात यावे.
- अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टी देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा.
- रासायनिक खते बियाणांचा रास्त दरात सुरळीत पुरवठा करावा.
- कृषी यांत्रिकीकरण सूक्ष्मसिंचन नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करण्यात यावी.