Nagpur News : चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली गावानंतर आता नागपूर शहरातही बर्ड फ्लू (Bird Flu) ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बर्ड फ्लू आढळून आल्यामुळे प्रशासनात मात्र खळबळ उडाली आहे. कालपासून विदर्भातील चंद्रपूर आणि नागपूर (Nagpur) या दोन जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू चे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे त्या अनुषंगाने प्रशासन सतर्क झाले आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या ताजबाग परिसरात एका व्यक्तीच्या घरातील तीन कोंबड्याचा 31 जानेवारीनंतर अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मृत्यूची माहिती पशु संवर्धन विभागाकडे दिली असता पशु संवर्धन विभागाकडून या प्रकारणाची तपासणी केली. दरम्यान या तपासणीनंतर भोपाळच्या 'राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळे'च्या अहवालात कोंबड्यांचे मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे पॉसिटीव्ह रिपोर्ट आले आहे. परिणामी, पशुसंवर्धन विभागाकडून ताजबाग परिसरातील एक किलोमीटरच्या परिसरात प्रतिबंधनात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण
सध्या पशुसंवर्धन विभागाचे खास पथक महापालिकेसोबत मिळून पाहणी करत आहे. पोलिसांच्या सुरक्षेत संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण करून त्या भागातील कोंबड्यांची सखोल तपासणी केली जाईल. हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे नागपूरतील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरर मधील 4 पैकी 2 बिबट्यांची बर्ड फ्लूची लागन
नुकतेच चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर मधील 4 पैकी 2 बिबट्यांची H5N1 अर्थात बर्ड फ्लू ची "सिरो" टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीसेसने या संदर्भात अहवाल दिला होता. दरम्यान, नागपूर येथील गोरेवाडा येथे 4 वाघांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्यानंतर चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथील प्राण्यांची देखील चाचणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापूर्वी मृत पावलेल्या 4 गिधाडांची देखील बर्ड फ्लू टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या 4 गिधाडांचा चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यू झाला होता. तर मृत पावलेल्या सर्व गिधाड्यांना याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे आणून पोस्टमार्टम करण्यात आले होते.
त्यानंतर याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मधून 3 वाघ 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला करण्यात शिफ्ट आले होते आणि याच 3 वाघांचा डिसेंबर महिन्याच्या 20 ते 23 तारखेदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बर्ड फ्लूची लागण झालेल्या गिधाडांमुळेच चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये ठेवलेले 3 वाघ संक्रमित झाले आणि नंतर त्यांचा नागपूरच्या गोरेवाडा मध्ये मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय त्यावेळी बळावला होता. दरम्यान आता चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली गावानंतर आता नागपूर शहरातही बर्ड फ्लू ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
हे ही वाचा