Bigg Boss 18 Finale Date: सलमान खानचा (Salman Khan) शो बिग बॉस 18 (Bigg Boss 18) सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. ऑक्टोबरमध्ये शो सुरू होऊन 2 महिने झाले आहेत. शोमध्ये चाहत पांडे, विवियन डिसेना, करण वीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, कशिश कपूर, रजत दलाल, चुम दरंग, अविनाश मिश्रा असे अनेक स्पर्धक दिसत आहेत. प्रत्येक नवीन दिवसासोबत या शोमध्ये एक नवा ड्रामा पाहायला मिळतोय.                                                


सलमान खानचा शो कधी संपणार?


बिग बॉसच्या या सीझनला प्रेक्षकांचाही भरभरुन प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच हा सीझन सर्वोत्तम सीझनपैकी एक असल्याचंही म्हटलं जातंय. पण आता लवकरच हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलेलं आहे.  बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, हा शो पुढच्या एका महिन्यात संपू शकतो. रिपोर्ट्सनुसार, शोचा ग्रँड फिनाले तारीख 19 जानेवारीला होणार आहे.  भरभरून प्रेम देत आहेत. 


दरम्यान शोच्या फिनालेच्या तारखेविषयी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण जर या शोचा ग्रँड फिनाले 19 जानेवारी रोजी होणार असले तर चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी केवळ एकच महिना उरला आहे. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार शोला एक्स्टेंशन मिळू शकते. टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, बिग बॉस 18 च्या फिनालेची तारीख 19 जानेवारी नसून 8 किंवा 15 फेब्रुवारी असू शकते.


या सीझनचा विजेता कोण होणार याविषयी देखील माहिती सध्या समोर येत आहे. या सीझनच्या वीकेंडचा वारही खूपच  मनोरंजक होत असल्याचं सांगण्यात येत आहे.  मात्र, सर्व एपिसोड सलमान खानने होस्ट केलेले नाहीत.फराह खान, रवी किशन, अनुराग कश्यप यांसारख्या पाहुण्यांनी देखील हा शो होस्ट केला. आजकाल करण वीर मेहरा आणि चुम दरंग यांची मैत्री चर्चेत आली आहे. दोघेही शोच्या सुरुवातीपासूनच मित्र होते आणि खूप जवळ आले होते. 






ही बातमी वाचा : 


Fitness: श्वेता तिवारीचा आवडता 'हाच' तो पदार्थ, जो तिच्या तारुण्याचे रहस्य! सौंदर्य अन् फिटनेसमध्ये अनेकांना टाकते मागे, जाणून घ्या..