Walmik Karad : लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आयोजित होणाऱ्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव्यात यंदा एक वादग्रस्त प्रसंग घडल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले.

Continues below advertisement

या पोस्टरवर "We support walmik anna, कराड आमचे दैवत" असा मजकूर झळकत होता, कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकल्याची माहिती समोर येत आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, मला हे ऐकून अतिशय धक्का बसला आहे. एक सुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी मान शरमेने खाली घालणे गरजेचे आहे. या राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे. लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे. इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. यावर तुमचे म्हणणे काय? पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्या बाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे. धनंजय मुंडे यांना याबाबत विचारून काही फायदा नाही, कारण ती गॉन केस आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. 

Continues below advertisement

दसरा मेळाव्याची पार्श्वभूमी

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मोठ्या जल्लोषात पार पडत आहे. पंकजा मुंडे सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, पूजा व आरती केली. यावेळी धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांचीही उपस्थिती आहे. मुंडे समर्थक आणि भगवान बाबा भक्त मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजर राहिले असून, गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेण्यासाठी पंकजा मुंडे काय दिशा दाखवतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Thane Crime : मी इकडचा भाई, माझ्याकडून गरब्याची परवानगी घेतली का? ठाण्यात कार्यक्रमामध्येच शिंदेंच्या शाखाप्रमुखावर बंदूक रोखली अन्...