Walmik Karad : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी पुणे येथील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला होता. यासाठी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या MH 23 BG 2231 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर SIT ने कोर्टात दावा केला की, हीच गाडी वाल्मीक कराड यांनी फरार होताना वापरली आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास करण्यासाठी स्कार्पिओ गाडी जप्त करुन केज पोलीस ठाण्यात कव्हर टाकून झाकून ठेवण्यात आली आहे. 


वाल्मिक कराड तब्बल 22 दिवास फरार


वाल्मिक कराड तब्बल 22 दिवास फरार होता. त्यानंतर 31 डिसेंबरला अचानाक तो पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला होता. यानंतर वाल्मिक कराड स्वत: शरण का आला?, यामागचं नेमकं कारण काय?, अशी चर्चा रंगली आहे. परंतु वाल्मिक कराडने आत्मसमर्पण का पत्कारलं? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यावेळी वाल्मिक कराडने पुण्याच्या सीआयडी कार्यालयात येण्यासाठी जी गाडी वापरली होती, ती गाडी जप्त करण्यात आली आहे. ती गाडी केज पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. 


खंडणीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपुरात असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तो पुण्यात राहिला. यानंतर साधारण आठ दिवसापूर्वीनंतर तो महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याची माहिती उघड झालीय. त्यानंतर राज्याबाहेर गेल्यावर त्यानं इतर राज्यामध्ये देवदर्शन केल्याचीही माहिती मिळाली होती. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटूंबाने आंदोलने केली. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. 


पोलिसांना शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडने जाहीर केली होती भूमिका 


केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.