Supriya Sule : मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावे लागेल, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. याआधी ज्या ज्या वेळेस आरोप झालाय त्यावेळेस नैतिकतेच्या आधारे राजीनामा घेतला आहे. आता राजीनामा मागीतला आहे. पण तेच घेत नाहीत, हे तुम्हाला सरकारला विचारावं लागेल असे सुळे म्हणाल्या.
दुधाला 40 रुपये दर मिळाला पाहिजे
सरकार स्थापन व्हायला वेळ गेला. निवडणुकीमध्ये जो शब्द दिला तो पाळा हीच आमची मागणी असल्याचे सुळे म्हणाल्या. दुधाला दर मिळाला पाहिजे. लिटरला 40 रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे सुळे म्हणाल्या. आम्ही पत्र लिहलं पण आमचीमागणी मान्य झाली नाही असे सुळे म्हणाल्या.
सरसकट कर्जमाफी कधी मिळणार
देवेंद्रजी ऍक्शन मोडवर दिसतात, ते विविध कामात व्यस्त असतात असेही सुळे म्हणाल्या. सरकारने सोयाबीन, कपाशीला हमीभाव देऊ असा शब्द दिला होता असेही सुळे म्हणाल्या.
सरसकट कर्जमाफी देऊ असेही सांगितले होते असे सुळे म्हणाल्या. नैतिकतेला धरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे असे सुळे म्हणाल्या.सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा. आता सुरेश धस, बजरंग सोनवणे यंच्यावर बोललं जात आहे असे सुळे म्हणाल्या. एवढी मोठी सत्ता आल्यावर क्राईम कमी व्हाययला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
राजकारण वेगळे आणि राजकीय जबाबदारी वेगळी
राजकारण वेगळे आणि राजकीय जबाबदारी वेगळी. कुटुंब उंबऱ्याच्या आत असे सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणं टाळले. देवेंद्र फडणवीस सोडून सरकारमध्ये कुणीच ऍक्शन मोडवर दिसत नाही. पवार साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. सगळ्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे असे सुळे म्हणाल्या. पालकमंत्री पदात नेमकं काय आहे,त्याच्यासाठी एवढा वेळ का जातोय असेही सुळे म्हणाल्या. पालकमंत्रीपदाबाबत एवढी चर्चा आम्ही कधीच ऐकली नाही. एवढी रस्सीखेच का केली जाते. एवढं गुढ याच्यामध्ये काय आहे मला माहित नाही असेही सुळे म्हणल्या.
HMPV विषाणू वाढत आहे, सरकारनं लक्ष दिलं पाहिजे
HMPV विषाणू वाढत आहे. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस राजेश टोपे यांनी खूप चांगलं काम केलं होतं. राज्य सरकारने योग्य उचलणं गरजेचं आहे. असे सुळे म्हणाल्या. दिल्ली निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने योग्य पध्दतीने काम करावं असेही सुळे म्हणाल्या.