Walmik Karad Custody : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडबाबात (Walmik Karad) एक मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत (Walmik Karad MCOCA) गुन्हा दाखल केल्यानंतर आज कराड (Walmik Karad) याला न्यायालयाने पुन्हा मोठा झटका दिला आहे.


बीड न्यायालयाकडून वाल्मिक कराडच्या 7 दिवसांची SIT कोठडीला मान्यता देण्यात आली आहे.  एसआयटीतर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी आज संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला. दरम्यान वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून करण्यात आला. परिणामी या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता एसआयटीने 10 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र या मागणीला बीड कोर्टाने मान्यता देत पोलीस कोठडी एवजी 7 दिवसांची SIT कोठडीला मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या 22 जानेवारीपर्यंत वाल्मिक कराडचा मुक्काम SIT च्या कोठडीत असणार आहे. 


हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी


दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या 9 डिसेंबर रोजी झाली, त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले.  या दरम्यान तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झाला याचा तपास एसआयटीला करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या दहा दिवसाच्या कस्टडीची मागणी SIT तर्फे करण्यात आली होती.  तसेच वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून करण्यात आला आहे. परिणामी प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता एसआयटीच्या या मागणीला बीड कोर्टाने मान्यता देण्याची शक्यता आहे.


फरार कृष्णा आंधळेला लपवण्यात कुणाचा हात?


दरम्यान, या प्रकरणात पुढे आलेल्या माहितीनुसार विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सरकारी वकिलांकडून करण्यात आली आहे. यात विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यामध्ये काही परस्पर संबंध काय आहेत? याची माहिती घेण्यात आलीय.  तसेच फरार आरोपी अजून सापडायचा आहे त्या कृष्णा आंधळे याला लपवण्यात यांचा हात आहे का? याची माहितीही SIT ला घ्यायची आहे.   सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे गेले अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? याची माहितीही SIT ला घ्यायची आहे. परिणामी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशी संदर्भात बीड न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी मान्य केली आहे. 


न्यायालयात SIT तर्फे तपासअधिकारी अनिल गुजर यांनी तपासाची कोणती माहिती दिली?


संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली. त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले, अशी एसआयटीने बीड जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान माहिती दिली. तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात त्या दिवशी नेमकं काय बोलणं झाला याचा तपास करायचा आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि य तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ मिळतीजुळती आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या दहा दिवसाच्या कोठडीची मागणी एसआयटीकडून करण्यात आली होती.  


इतर महत्वाच्या बातम्या