पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचं समोर येत आहेत. वाल्मिक कराडच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. कराडचे पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा (Walmik Karad) फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्याच्या शरण येण्याआधी त्याच्या बँक खात्यावरतीही कारवाई करण्यात आलेली होती. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सवाल उपस्थित केले आहेत. 


 कराडचे कीती अकाउंट सील केले 


पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, वाल्मिक कराडचे किती अकाउंट सील केले आणि त्यात किती पैसे होते हे समजायला हवे. याप्रकरणात ईडी का लागत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर आज कबड्डीचा बारामतीत कार्यक्रम आहे. तिथे शेतकऱ्यांनी वाल्मिक कराड विरोधात केलेल्या तक्रारीची माहिती घेणार आहे. हे सर्व गंभीर आहे. सरकारने यावर कारवाई करावी, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. वाल्मिक कराडवर झालेले आरोप गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून कारवाई करावी. कराडचे कीती अकाउंट सील केले आणि त्यात किती पैसे होते हे समजायला हवे. या प्रकरणात ईडीची कारवाई का होत नाही, अनिल देशमुख आणि इतर नेत्यांवर ईडी लागली. मात्र, इथे गुन्हा नोंद असूनही ईडी का लागली नाही, काल परळीत हिंसाचार झाला. टायर जाळले गेले, आंदोलन झाले त्यावेळी पोलीस काय करत होते? असा सवाल देखील सुळेंनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित केला आहे.


वाल्मिक कराडवर मकोका लावला याबद्दल सरकारचे अभिनंदन. देर आये दुरुस्त आये. पण खंडणीचा प्रकार थांबायला हवा. असेच होत राहिले तर राज्यात गुंतवणूक कशी येणार असंही त्यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्यासह परभणीतील घटनेतील दोघांना न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणामध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील सुळेंनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यावेळी केली आहे. 


धनंजय मुंडे जर वाल्मिक कराडच्या आईंना भेटले...


धनंजय मुंडे जर वाल्मिक कराडच्या आईंना भेटले असतील तर हे शॉकींग आहे. त्यांचा अजेंडा काय आहे? राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो. अनेक नेत्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा बीड जिल्ह्याचा प्रमुख आहे का हे पाहा. या प्रकरणात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून म्हटलं की आपण वातावरण सुधारण्यासाठी सर्वपक्षीय बैठक करु. सर्व पक्षाचे नेते राजकारण बाजुला ठेवून या प्रकरणात माणुसकीच्या बाजुला आहेत, यामध्ये कोणतंही राजकारण न आणता या दोन्ही कुटूंबाला न्याय देणं गरजेचं आहे, आणि राज्य कसं शांत होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत, शांततेच्या मार्गाने सर्व पार पडावं, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 


अमित शाहांकडून आमची अपेक्षा...


बीड आणि परभणी शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. केंद्रीय मंत्री अमित शाह राज्यात आले होते, ते देशाचे गृहमंत्री आहेत, शहांकडून ते बीड आणि परभणीबद्दल बोलतील अशी अपेक्षा होती, ते बीड आणि परभणीमध्ये शांतता निर्माण होण्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पुर्णपणे पारदर्शकपणे करेल अशी अमित शाहांकडून आमची अपेक्षा होती, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हटलं आहे.