Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik karad) याने न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्याने आपल्याला एक स्लीप ॲप्निया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी या याचिकेतून केली आहे. दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik karad) मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी 15 दिवसाच्या सीआयडी कोठडीत करण्यात आली आहे. त्यानंतर आता वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. या दरम्यान त्याने मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे तो आजार?
वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. ऑक्सीजनसारखं मशीन त्याला दररोज लावलं जात ते चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडने केली आहे. रुग्णाला अशावेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते. मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे विनंती केली आहे. या अर्जानंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे सुचवले आहे, अशी माहिती आहे.
वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे, सीआयडी कोठडीमध्ये 24 तास मदतनीस मिळावा अशी मागणी वाल्मिक कराडने न्यायालयाकडे केली आहे, वाल्मिक कराड मंगळवारी सीआयडी समोर शरण आला, त्याच्यावर खंडणीसोबतच बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा देखील आरोप आहे, दरम्यान त्याने शरण आल्यानंतर खंडणी प्रकरणात शरण आल्याचं त्यानी सांगितलं. त्यानंतर आता त्याने 24 तास मदतनीस मिळावे याची मागणी केली आहे.
वाल्मिक कराड याने न्यायालयात त्याबाबतचा अर्ज केला आहे, त्यामध्ये आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचं त्याने म्हटलेलं आहे, त्याला रोज ऑक्सिजन सारखी एक मशीन लावली जाते, ती मशिन ऑक्सिजन नसून त्याला झोप येण्यासाठी लावली जाते, अशी माहिती आहे. ती मशीन लावण्यासाठी आणि इतर कामांसाठी 24 तास मदतनीस मिळण्याची मागणी वाल्मिक कराड यांनी न्यायालयाकडे केली आहे, आता न्यायालय याच्यावरती काय निर्णय देईल हे महत्त्वाचं ठरणार आहे.