बीड - सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या तसेच पवनचक्कीला दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील विष्णू चाटे याच्या पोलिस कोठडीत आहे, त्यांने दिलेल्या  माहितीनंतर आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, वाल्मिक कराडचे  (Walmik Karad) अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचे चाटे यानी कबुली देताना म्हटलं आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे. विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने  (Walmik Karad) धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार दिली होती, कराडने पवचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटे याने कबूल केलं आहे, त्यामुळे कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 


नेमकं काय सांगितलं विष्णू चाटे याने?


बीडच्या दोन कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे, खंडणी प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडच्या अडचणी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीमध्ये कबुली दिलेली आहे, वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांची फोनवरती संभाषण केलं होतं, वाल्मिक कराड याचं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं, अशी कबुली विष्णू साठे यांनी दिलेली आहे, सीआयडी न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा त्यांनी केला आहे, विष्णू चाटेच्या फोनवरून कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार केली होती, कराडने कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केले असल्याचा देखील विष्णू साठे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


खंडणी प्रकरणांमध्ये वाल्मि कराडचा थेट संबंध याद्वारे जोडला गेलेला आहे, पीसीआरसाठीची मागणी केलेली होती, त्या पीसीआरचा रिपोर्ट समोर आला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, विष्णू साठे आणि जी खंडणी मागितली होती, ती त्याच्या स्वतःच्या फोनवरून मागितली होती. त्यावेळी तिथे वाल्मिक कराड देखील उपस्थित होता. त्याच्या फोनवरून वाल्मिक कराड याने संबंधित अधिकाऱ्यांना खंडणी मागितली होती, असं स्पष्ट झालं आहे. सीआयडी तपासामध्ये विष्णू चाटे याने तशा प्रकारची माहिती दिली आहे याचा उल्लेख सीआयडीच्या रिपोर्टमध्ये आहे. विष्णू चाटे यांनी दिलेल्या कबुली जबाबमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी निश्चित वाढणार असल्याचं चित्र आहे. या रिपोर्टनुसार वाल्मिक कराड यानी खंडणी मागितली होती आणि त्यामुळे आता कराड वरती असलेला आरोप काटे यांनी मान्य केल्याचं दिसून येत आहे.


कोण आहे विष्णू चाटे?


विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचे बोलले जात आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचा निलंबन करण्यात आले आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा खून (9 डिसेंबरला) झाला होता.



विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचे पूर्वी सरपंच होता. त्यानंतर विष्णू चाटे याला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आले. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक असून तो वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय समजला जातो.विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.