Vaidyanath Sahkari Sakhar Karkhana: बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) तालुक्यातील पांगरी येथे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Vaidyanth Sahkari Sakhar Karkhana) विक्रीच्या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या विक्रीविरोधात आता रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

Continues below advertisement

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप आहे की, कारखाना विक्रीचा निर्णय कोणत्याही सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेण्यात आला आहे. कारखाना 132 कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विकण्यात आला असून, 14 ऑगस्ट 2025 रोजी अंबाजोगाई येथील रजिस्ट्री कार्यालयात ही नोंद करण्यात आली आहे.

Vaidyanath Sahkari Sakhar Karkhana: विक्रीबाबत अनेक प्रश्नचिन्हं

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी परळी तालुक्यातील कारखाना अंबाजोगाईमध्ये कसा विकला जाऊ शकतो? असा सवाल उपस्थित केलाय. त्यांनी स्पष्ट केलं की, कारखाना कौठळी तांडा येथील कुळाच्या जमिनीत उभा आहे आणि अशा जमिनीत विक्रीला कायदेशीर मर्यादा आहेत. याशिवाय, करारावर पंकजा मुंडे आणि संचालक मंडळाच्या सह्या असल्या तरी त्यांच्या बहिणी यशश्री मुंडे यांची सही नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यशश्री मुंडे यांनी हा व्यवहार मान्य केला नव्हता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला जात आहे.

Continues below advertisement

Vaidyanath Sahkari Sakhar Karkhana: बँक कर्ज बुडवण्यासाठी विक्री?

संघटनेचा आरोप आहे की, हा व्यवहार कवडीमोल दराने करून बँकांचे कर्ज बुडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Vaidyanath Sahkari Sakhar Karkhana: परमेश्वर गीते यांचा आक्षेप आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज

या प्रकरणावर कायदाविषयक सल्लागार परमेश्वर गीते यांनीही गंभीर आक्षेप घेतले आहेत. काही काळ कारखान्याशी कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या गीतेंनी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करून कारखान्याच्या खरेदीखतावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे.

Vaidyanath Sahkari Sakhar Karkhana: उपोषणाचा इशारा

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली नाही, तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी बेमुदत उपोषणाला बसले जाईल. या आंदोलनामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा तीव्र घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा 

Beed Crime Walmik Karad: थोडीशी मदत अण्णासाठी...! वाल्मिक कराडच्या नावाने आर्थिक निधी द्या; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, मुंडे बंधू भगिनींचेही फोटो झळकले, बीडमध्ये खळबळ