Beed Crime News बीड : बीड पोलिसांनी (Beed Police) आणखी एका टोळीवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई केली असून गेल्या नऊ महिन्यातील ही सहावी कारवाई आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांनी आतापर्यंत पाच टोळ्यांवर (Beed Crime News)  मकोका अंतर्गत कारवाई केली. नेकनुर येथील पवनचक्कीतील चोरी प्रकरणात आणखी एका टोळीवर मकोकांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

Continues below advertisement

Beed Police : मकोका, MPDA अंतर्गत कारवाई सुरूच राहतील

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात 12 ते 14 चोरट्यांच्या टोळक्यांनी नेकनूर येथील पवनचक्की प्रकल्पातून 17 लाख रुपयांची चोरी करत सुरक्षा रक्षकाला लोखंडी रॉड आणि कोयत्याने धमकावले होते. यादरम्यान झालेल्या गोळीबारात सुरक्षारक्षक राजू काळे जागीच ठार झाले. या प्रकरणात अधिक तपास करत पोलिसांकडून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यापुढे देखील सराईत गुन्हेगारांवर आणि टोळ्यांविरुद्ध मकोका, MPDA अंतर्गत कारवाई सुरूच राहतील, असा इशारा बीड पोलिसांनी दिलाय.

नाशिक शहर पुन्हा एकदा गुन्हेगारी कारवायांमुळे चर्चेत आले आहे, ज्यात सातपूर आणि गंगापूर रोडवरील गोळीबाराच्या घटनांचा समावेश आहे. या प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल यांची नावे समोर आली आहेत. सातपूर गोळीबार प्रकरणाच्या तपासात, पोलिसांनी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता तिथे एक गुप्त भुयार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी भूषण लोंढे फरार आहे.

Continues below advertisement

दुसरीकडे, गंगापूर रोड गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल, सचिन कुमावत आणि पप्पू जाधव यांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी तुकाराम सोतवे (चोथवे) आणि अजय बोरिसा यांचा शोध पोलीस घेत आहेत. याव्यतिरिक्त, पगाराच्या वादातून एका मिनी व्हॅन चालकाने मालकावर आणि मालकाने चालकावर चाकू हल्ला केल्याची घटनाही समोर आली आहे.

ही बातमी वाचा: