HSC Exam Result 2025: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेमुळे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, या कठीण परिस्थितीमध्येही संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिने बारावीच्या परीक्षेत (HSC Result 2025) घवघवीत यश मिळवून दाखवले आहे. बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.
संतोष देशमुख यांच्या कन्येने त्यांच्या हत्येच्या दोन महिन्यानंतर डोक्यावर दु:खाचा डोंगर असताना 12 बारावीची परीक्षा दिली होती.आज वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे असं तिने म्हटले होते. तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती.
HSC Result 2025: बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहे. बारावीचा निकाल आता ऑनलाईन दिसायला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची ऑफिशिअल वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
निकाल कुठे पाहता येणार?
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) पाहाण्यासाठी खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील.
mahresult.nic.in
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
https://hscresult.mkcl.org/
निकाल कसा पाहता येणार?
-सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर अथवा वर दिलेल्या वेबसाइट जा.
- त्यानंतर होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील त्यामध्ये टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.त्यानंतर तो सेव्ह करा आणि प्रिंट करा.
आणखी वाचा
बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI