बीड : बीडच्या तिरूमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या (Suresh Kute) अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेने 21 मे पासून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचं आश्‍वासन दिले आहे तर दुसरीकडे आज ज्ञानराधावर माजलगावमध्ये दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहे. यामध्ये एका गुन्ह्यात 3 लाख 80 रुपयांची फसवणूक तर दुसऱ्या गुन्ह्यात 1 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिरूमला उद्योग समूह याच मल्टीस्टेट बँकेत पैसे अडकल्यामुळे अडचणीत सापडला आहे.


गेल्या सात महिन्यांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत आणि  हजारो  ठेवीदार गेल्या सात महिन्यांपासून ठेवी परत मिळतील या आशेवर आहेत. आज माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सुरेश कुटे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेवीदारांनी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये तीन लाख 80 हजार रुपये हा पहिला गुन्हा तर दुसऱ्या गुन्ह्यात एक लाख 10 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी दुसरा गुन्हा माजलगाव पोलीसात नोंद झाला आहे. हे दोन्ही गुन्हे नोंद झाल्यामुळे सुरेश कुटे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसतं.


तिरुमला ग्रुपवर आयकर विभागाच्या धाडी 


बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी (Income Tax raid On Tirumala Group) टाकल्या होत्या. तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या. बीड, पुणे, सोलापूर, फलटण, औंगाबादमधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने कारवाई करत अनेक कागदपत्रे जप्त केली होती.  


सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचा गेल्या वर्षी भाजप प्रवेश


महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला (Tirumala) उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.


उद्योजक सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचे नावलौकिक केलं. 'द कुटे ग्रुप'मुळे बीड जिल्ह्यात बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं महिलांना नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिली आहे. 


ही बातमी वाचा: