Santosh Deshmukh Case Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेसंदर्भात (Sudarshan Ghule) एसआयटीला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील सर्व डाटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे .या डाटाचा पुढील तपास करण्यासाठी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे . SIT ने बीड जिल्हा न्यायालयाला पोलीस कोठडी देण्यात यावी असा अर्ज केला होता . त्यावर आज सुनावणी झाली. संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh case) केल्यानंतर वाल्मीक कराडशी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेने दूरध्वनीवरून संभाषण केले होते. सुदर्शन घुलेकडून जप्त केलेल्या मोबाईल फोन्सपैकी एका मोबाईलचे लॉक ओपन करण्यासह पुढील तपासासाठी ही कोठडी देण्यात आली आहे. (Beed)
बीड न्यायालयात आज झालेल्या सुनावणीसाठी संतोष देशमुख हत्याकांड आणि मकोका अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील तसेच सरकारी पक्षाकडून वकील बाळासाहेब कोल्हे तसेच आरोपीचे वकील अनंत तिडके बीड न्यायालयात हजर होते . संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईल तपासणीसाठी एसआयटी कडून आज पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती . दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. आरोपीचे जप्त केलेल्या 02 मोबाईल पैकी एक मोबाईलचे लॉक ओपन झालेले नसून आरोपीकडून मोबाईल लॉक ओपन करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे सांगण्यात आले. .
सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी काय युक्तिवाद केला ?
सुदर्शन घुलेकडे सापडलेल्या मोबाईल फोन्समध्ये असणारा डाटा एसटीआयने हस्तगत केला आहे . दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुदर्शन घुलेला चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आल्याचे सांगितले .व्हिडिओ संदर्भात फॉरेनसिक लॅबला रिपोर्ट आला आहे .त्या अनुषंगाने सुदर्शन घुलेची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागवण्यात आली होती .अजून एक मोबाईल सापडला असून मोबाईलचे लॉक उघडणे तसेच त्यातील पुढील तपासासाठी कोर्टाने चार दिवस म्हणजे 31 जानेवारी पर्यंत एसटीआय पोलीस कस्टडी मंजूर केली आहे असे त्यांनी सांगितले .
सुदर्शन घुलेच्या वकिलांनी काय केला युक्तिवाद ?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी वकील अनंत तिडके यांनी तपासी यंत्रणा जाणीवपूर्वक या प्रकरणाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी हे सर्व करत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला .18 तारखेला सुदर्शन घुलेला न्यायालयीन कोठडी झाली होती .आज आरोपी सुदर्शन घुले ची दहा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती .जे मोबाईल सुदर्शन घुले कडून हस्तगत करण्यात आले त्याचे पासवर्ड काढायचे आहेत .त्याचबरोबर जे डिजिटल पुरावे मिळाले आहेत त्याबद्दल विचारणं करायचे आहे . जर गेल्या 14 दिवसांपूर्वीच पोलिसांकडे ही माहिती होती तर आता कोणता मोबाईल त्यांना ओपन करायचा आहे असा प्रश्न त्यांनी केला .संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या काही तासानंतरच पोलिसांनी जे वाहन ताब्यात घेतलं त्यातच हे मोबाईल आढळून आले होते . इतके दिवस हे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहेत मग तो तपास आतापर्यंत का झाला नाही असा सवालही आरोपीच्या वकिलांनी केला .
हेही वाचा: