Beed Crime: सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असणाऱ्या बीड मधील परळीत शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे (Shivraj Divte) या तरुणाला अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी मारहाण करत याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा असं हे आरोपी आपापसात बोलत असल्याचाही समोर आलं. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ ही समोर आले. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ असून बीड जिल्ह्यात वातावरण तापले आहे. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या (19मे) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. ही बंदची हाक शांततेत होणार असून बीडच्या नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारण्याचा ठरवले आहे. असे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी एबीपी माझाला सांगितले. (Beed Band) सोशल मीडियावर पोस्टही व्हायरल होत आहेत.
उद्या बीड बंदची हाक
बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. गुंडगिरी आणि भाईगिरी लहान लहान मुलांमध्येही प्रचंड भिनल्याचे या घटनेवरून समोर येत आहे. दरम्यान शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या टोक्याचा म्होरक्या समाधान मुंडे याची एक ऑडिओ क्लिपही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाणीचे होणारे व्हायरल व्हिडिओ थांबले पाहिजेत. या व्हिडिओमुळे बीडचे तुलना बिहार शी केली जात आहे. हे थांबलं पाहिजे यासाठी बीडच्या नागरिकांनी उद्या 'बंद'चे आवाहन केले आहे. बीडची गुन्हेगारी थांबवण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचे नाव खराब न होण्यासाठी हा बंद पुकारण्यात येत असल्याचे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले. गुन्हेगाराला कुठलाही जात धर्म नसतो म्हणून हा बंद आम्ही अठरापगड जातीचे लोक एकत्र येऊन करणार आहोत असेही सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावर बंद आवाहन करणाऱ्या पोस्ट व्हायरल
परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी बीड जिल्हा बंदचे आवाहन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. काही पोस्ट च्या खाली मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र असे उल्लेखही करण्यात येत आहेत.
दरम्यान शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून पाच आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवराज दिवटेला आज खासदार बजरंग सोनवणे भाजप आमदार सुरेश धस भेटले. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील देखील भेट घेणार आहेत. शिवराज दिवटेवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा: