बीड : आपल्या घरावर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली त्यामागे राजकीय विरोधकांचा हात असून शकतो असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी केला. तसेच त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनीही कोणतीच कारवाई केली नाही असाही आरोप त्यांनी केला. 


माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर 30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून दगडफेक आणि मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्या घराचा आणि गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यावरूनच प्रकाश सोळंके यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. माझ्या घरावर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली त्यामध्ये राजकीय विरोधकांचा हात असू शकतो असे प्रकाश सोळंके म्हणाले असून जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना कायदेशीर अधिकार होते मात्र पोलिसांनी कुठलीच कारवाई यावेळी केली नसल्याचं प्रकाश सोळंके म्हणाले. 


मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन करण्याचा आव्हान केला असताना देखील काही लोकांनी माझ्या घरावर दगडफेकाने जाळपोळ केली. या प्रकरणानंतर माझ्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांना वाईट सांगितलं जात आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी इतरांचं ऐकून जाहीर सभेमध्ये माझ्याबद्दल वक्तव्य करू नये अशी विनंती देखील आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांना केली आहे.


आपल्यावर हल्ला करण्याचा उद्देश, प्रकाश सोळंखेंचा आरोप


माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी हल्लेखोरांची ओळख पटवली. यामध्ये इतर समाजाचे लोक देखील असल्याचं त्यांनी सांगितलं असून यामध्ये अवैध धंदे आणि राजकीय विरोधक कट रचून माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला असल्याचा प्रकाश सोळंके यांनी आरोप केला. तर यामध्ये काही शिक्षक आणि ग्रामपंचायतचे सदस्य देखील असल्याचा दावा सोळंके यांनी केला होता. काही हल्लेखोरांकडे धारदार शस्त्र देखील होती, त्यामुळे ते माझ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले असावे असे देखील सोळके म्हणाले होते.


ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्ला 


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून एका आंदोलकाने प्रकास सोळंके यांना फोन केला होता. त्यावेळी बोलताना प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरून राडा झाला झाला. प्रकाश सोळंके यांच्यांशी साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रकाश सोळंके यांच्या घरावर मोठी दगडफेक करण्यात आली आणि जाळपोळही करण्यात आली. सुमारे एक ते दीड तास ती दगडफेक सुरू होती. आंदोलकांनी सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या. प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यातून धुराचे लोळ येत असल्याचं पाहायला मिळत होते. त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके घरातच उपस्थित होते. 


ही बातमी वाचा: