Maratha Reservation : सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना बीड पोलिसांनी (Beed Police) आणखी एक धक्का दिला आहे. लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आदर्श आचारसंहिता (Code Of Conduct) लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजिनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) धाव घेतली आहे. त्यामुळे या याचिकेवर खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. शैलेश ब्रह्मे यांच्यासमोर आज सकाळी सुनावणी अपेक्षित आहे. 


मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत बैठका घेत आहे. अशात परळी वैजिनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज मार्च सायंकाळी 6 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीची जनतेला माहिती व्हावी, यासाठी संयोजकांनी परळी शहर आणि संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांकडे ऑटोरिक्षावर ध्वनिक्षेपक वाजविण्यासाठी 13 मार्च रोजी रीतसर अर्ज केले होते. पोलिसांनी 16 मार्चला काही अटी शर्ती घातल्या. याविरोधात संयोजकांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. पण, लोकसभेची आचारसंहिता लागू झाली असल्याने जात, धर्म, भाषेवर एकत्र येऊ नका, असा आदेश देण्यात आला. त्यामुळे या नोटीसला सभेचे संयोजक दत्तात्रय विठ्ठलराव गव्हाणे आणि व्यंकटेश शिंदे यांनी अॅड. सुदर्शन साळुंके यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले आहे.


मनोज जरांगे यांच्यावर आठ गुन्हे दाखल...


मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या अडचणीत सतत वाढ होतांना पाहायला मिळत आहे.  विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्यावर 2024 मध्ये एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात  आले आहेत. मागील आठवड्यात दोन दिवसांत पाच गुन्हे जरांगे यांच्यावर बीडमध्ये दाखल झाले आहेत. सोबतच मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या जेसीबीवर देखील पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांनी जेसीबी चालक आणि मालकांचा शोध सुरु केला आहे. 


24 मार्चच्या बैठकीला परवानगी मिळणार का? 


मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत आंतरवाली सराटीमध्ये 24 मार्च रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यभरातील आणि इतर राज्यातील मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे या बैठकीला पोलिसांकडून परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Manoj Jarange Patil : निवडणूक लढणार की नाही? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं, पश्चातापाची वेळ आणेन; सरकारला अल्टिमेटम