Beed News : पावसाळा (Monsoon) सुरू झाल्यानंतर जुलै महिना संपत आला तरी बीड जिल्ह्यामध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. बीडमध्ये कमी पावसामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. यावर्षी उशिरा पेरण्या झाल्याने मूग आणि उडदाचे क्षेत्र कमी झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 78 टक्के एवढाच पाऊस झाला असून बीड जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये केवळ 14 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर, तिकडे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये सर्वात कमी म्हणजेच 98 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.


बीड जिल्ह्यात पावसाची उसंत


बीड जिल्ह्यातील एकही तालुक्यात अद्यापही शंभर टक्के पाऊस झालेला नाही तर दुसरीकडे मान्सून वेळेवर येणार असं सांगण्यात आलं होतं मात्र मान्सूनने चांगलीच ओळख दिल्याने जुलै महिना संपत आला तरी शेतकऱ्यांच्या डोळे अजून आभाळाकडे लागलेले आहेत तर अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अध्याप देखील काही शेतकऱ्यांच्या प्रेरणा रखडल्या आहेत.. तर जून महिन्यामध्ये काही भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, मात्र, आता पावसाने मोठी उसंत दिल्याने उगवून आलेल्या पिकाला पाण्याची आवश्यकता असून पावसाला जर अशीच उसंत दिली तर शेतकऱ्यांच मोठ नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. प्राणिक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.


पुरेसा पाऊस न झाल्याने बळीराजा संकटात


तर दुसरीकडे पाऊस लांबल्याने फक्त पेरण्यास रखडल्या नाही तर बीड जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा देखील आटू लागला आहे जिल्ह्यात माजलगाव मध्ये एक मोठा प्रकल्प असून 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्प आहेत आणि याच प्रकल्पामध्ये सध्या फक्त 14 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.. तर दुसरीकडे कृषी विभागाच्या वतीने पावसामध्ये मोठा खंड पडत असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी द्यावे अशा सूचना देण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मोठा गाजावाजा करत सुरु झालेली नगर-आष्टी बहुप्रतिक्षित रेल्वे बंद; 'ही' आहेत कारणं