बीड: जिल्ह्यातील परळी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाइल समोर ठेवूनच कॉपी (Copy) करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात (Education Sector) एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय डमी विद्यार्थी बसवल्याचाही आरोप करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) संलग्न परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील हा सर्व प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी करत असलेल्या कॉपीच्या घटनेचं व्हिडीओसह चित्रण करीत परीक्षार्थीचे मोबाइल (Mobile) जप्त करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


काय आहे प्रकरण? 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सध्या वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा सुरु आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात देखील विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयात परीक्षा घेण्यात येत आहे. असे असतांना परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क विध्यार्थी मोबाइल समोर ठेवून कॉपी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा भांडाफोड करण्यासाठी एका सहकेंद्रप्रमुखाने सर्व कॉपीच्या घटनेचं व्हिडीओसह चित्रण देखील केले. मात्र, संबंधित विध्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई न करता हा प्रकार समोर आणणाऱ्या सहकेंद्रप्रमुखाचीच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदली केली आहे. हा सर्व प्रकार कुलगुरूंना समजताच त्यांनी परीक्षा संचालकांची कानउघाडणी करीत परीक्षेसाठी बैठे पथक नेमण्याचे आदेश दिले आहे. दुसरीकडे, या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत सहकेंद्रप्रमुखासह अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले आहे. 


परीक्षार्थीकडून धमकावण्यात देखील आले


12 डिसेंबरपपासून विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. दशरथ रोडे यांची सहकेंद्रप्रमुख म्हणून परीक्षा विभागाने नियुक्ती केली होती. त्यानुसार, रोडे परीक्षा केंद्रावर गेले.  दरम्यान, प्रा. रोडे यांनी परीक्षा हॉलमध्य जाऊन पाहणी केली असता पर्यवेक्षकांसमोर विद्यार्थी थेट मोबाइल समोर ठेवून उत्तरपत्रिका लिहीत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी या सर्व घटनेचे व्हिडीओ काढले, त्यानंतर विद्यार्थ्यांचे मोबाइल जप्त केले. रोडे यांना काही परीक्षार्थीकडून धमकावण्यात देखील आले. त्यामुळे, त्यांनी या सर्व प्रकरणाची लेखी तक्रार कुलगुरू यांच्याकडे केली आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


CBSE Exam Date 2024 : CBSE बोर्डाकडून 10वी आणि 12वीची डेटशीट जाहीर; 'या' तारखेपासून सुरु होणार परीक्षा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI