बीड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) लागू झाल्यानंतर आम्हाला गुलाम म्हणता, गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता, मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का? असा परखड सवाल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विचारला. आमच्या पोराबाळांचा पाणउतार करण्यासाठी, जातीता अपमान करण्यासाठी यांना 30 वर्षे निवडून दिले का? असा प्रश्न विचारत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे (Pankaja Munde), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना टोला लगावला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मुंडे बंधूंवर टीका केली.
Manoj Jarange Speech Today : आपल्याला गुलाम म्हणणाऱ्यांसाठी काम कशाला करता?
राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत मनोज जरांगे यांनी त्यावर टीका केली. ते म्हणाले की, "त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅझेट आहे. मी त्यांना काहीही बोललो नाही. मी बोलायला सुरू केलं तर काय होईल. लोकाच्या लेकराबाळाला तुच्छ समजू नका. गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता, आमच्या लेकांना गुलाम समजता काय? अशा लोकांच्या सोबत काम करणारे मराठ्यांच्या पैदाशी कोण कोण आहेत? तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणाले, त्यांचा प्रचार करतो काय? पाच-दहा लाखांसाठी कशाला चाटता? आम्ही जर गुलाम आहोत तर मराठ्यांनो, त्यांच्याकडे कशाला काम करता?
Manoj Jarange Narayan Gad Melava : कशाला कुणाच्या पायाखाली काम करता?
आमचं गुलामीचं गॅझेट आहे तर मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का? मग इंग्रजांनी केलेल्या 1931 च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण घेतला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? आम्ही बिघडलेल्या रक्ताचं नाही. तुम्ही तिकडून अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडे निझामाची चाकरी करायला लागला असं आम्ही म्हणायचं का? पण आम्ही तसं म्हणत नाही असं मनोज जरांगे म्हणाले.
आम्ही कुणाला घाबरत नाही. माजलेल्यांना नीट करायची ताकद आमच्यात आहे. यांनी आपल्या जातीवर बरंच बोललं, आम्हाला पण सगळं बोलता येतं. पण आता मापात राहा. तुम्ही असं बोलण्यासाठीच मराठ्यांनी तीस वर्षे निवडून दिलं का? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला.
Manoj Jarange Beed Speech : यांना निवडणुकीत खपाखप पाडा
मनोज जरांगे म्हणाले की, "हे बदलणारे नाहीत. त्यामुळे दया माया जरा कमी करा. मराठ्यांच्या विरोधात जे कोण उभा राहतील त्यांना खपाखप पाडा. जेव्हा असं होईल त्यावेळी ते मराठ्यांसोबत चांगलं राहतील. तुमच्या लेकरांना गुलाम म्हटलं, मग ते तुमच्या लेकरांपेक्षा मोठे आहेत का?"
Manoj Jarange On OBC Leaders : ओबीसी समाजाला दोष नको
आजपासून कधीच ओबीसी समाजाला दोष द्यायचा नाही. ओबीसींची समाजाचा काही संबंध नाही. याच्यात काही नेते आहेत. सगळ्या माळी समाजाचा दोष आहे का? ते छगन भुजबळ बावचाळले आहे. त्यामुळे काही नेते यामध्ये बोलतात असं मनोज जरांगे म्हणाले.
ही बातमी वाचा: