बीड : जिल्ह्यातील गेवराईतील रुई गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 22 वर्षीय एका तरुणाने उंदीर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. लग्नानंतरही पत्नी सतत बॉयफ्रेंडसोबत बोलायची, अनेकदा समजावूनही पत्नीच्या सवयीत कोणताही बदल होत नव्हता. त्यामुळे पतीनेच स्वतः आपलं जीवन संपवलं आहे. पत्नीचे परपुरुषाशी असलेल्या संबंधांना कंटाळून या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी तलवाडा पोलिसात पत्नीसह एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम महेमूद शेख (वय 22 वर्षे, रा. रुई, ता. गेवराई) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, सलीम याचा 25 मे 2023 रोजी अर्धामसला येथील तरुणीसोबत विवाह झाला होता. मात्र, लग्न झाल्यापासून सलीम याची पत्नी नेहमी मोबाईलवर परपुरुषाशी बोलत असे. त्यामुळे त्याने अनेकदा तिला समजावून सांगितले होते. बऱ्याचदा सांगून देखील पत्नीच्या सवयीत काहीच बदल झाला नाही. त्यामुळे सलीमने 2 सप्टेंबर रोजी राहत्या घरी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध घेतले.
तर, सलीमने उंदीर मारण्याचे औषध घेतल्याने त्याच्यावर सिरसदेवी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बीड येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती खालावत असल्याने त्याला औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलिसांत गुन्हा दाखल...
दरम्यान, या प्रकरणी मृत सलीमचा भाऊ शाहरुख महेमूद शेख याने 12 सप्टेंबर रोजी तलवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन मृताची पत्नी आयशा सलीम शेख, प्रियकर किरण पिंपळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी किरण पिंपळे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
अनकेदा समजावून सांगितले...
सलीमचं चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान विवाहा झाल्यानंतर तो आनंदी होता. मात्र, याच दरम्यान आपली पत्नी इतर पुरुषासोबत सतत फोनवरून बोलत असल्याचा त्याला संशय आला. त्यामुळे त्याने खात्री केली असता, त्याचा संशय खरं ठरला. त्याने आपल्या पत्नीला फोनवरुन न बोलण्याचा अनेकदा समजावून सांगितले. मात्र, पत्नीच्या सवयीत कोणताही बदल होत नव्हता. त्यामुळे त्यान उंदीर मारण्याचं औषध घेऊन आत्महत्या केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed Crime News : पत्नी-पत्नीचा वाद टोकाला, गळफास लावून केली दोघांनी आत्महत्या; बीड जिल्ह्यातील घटना