Beed Political News: काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून निलंबित केलेले जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) भाजपच्या (BJP) आणखी जवळ जातानाचे चित्र पाहायला मिळत आहे. तर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील विकासकामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करुन, क्षीरसागर यापुढे फडणवीसांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे दिशा निर्देश दिले होते. तर नुकत्याच गहिनीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आणखी जवळीक पाहायला मिळाली. त्यामुळे पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) डावलून जयदत्त क्षीरसागर यांच्याशी फडणवीसांची जवळीक वाढत असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. 


पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना टाळून देवेंद्र फडणवीस यांना गहिनीनाथ गडावर बोलून त्यांचा सन्मान जयदत्त क्षीरसागर यांनी केला होता. त्यामुळे भविष्यात जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील भाजपाचे नेते असतील अशी चर्चा राजकीय गोटामध्ये पाहायला मिळत आहे. तर बीड जिल्ह्यातील आणखी एक ओबीसी नेता भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे आगमी काळात जयदत्त क्षीरसागर यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाल्यास नवल वाटू नयेत. 


पहिल्यांदाच सोहळा मुंडे कुटुंबियांशिवाय पार पडला


बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा सोहळा महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तसेच राजकीयदृष्ट्या देखील हा सोहळा महत्त्वाचा समजला जातो. विशेष म्हणजे गहिनीनाथ गडावरील सोहळ्यात मुंडे भावंड परंपरेनुसार दरवर्षी एका व्यासपीठावर येतात. मात्र पहिल्यांदाच गहिनीनाथ गडावरील सोहळा मुंडे कुटुंबीयांशिवाय पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. परंतु, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे मंडे भगिणींच्या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  


जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये जाणार? 


ठाकरे गटात असताना जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमधील विकासकामांच्या शुभारंभावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर क्षीरसागर आणि फडणवीस यांच्यातील जवळीक अधिकच वाढली असल्याची चर्चा आहे. दरम्यान आता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना टाळून देवेंद्र फडणवीस यांना गहिनीनाथ गडावर बोलून त्यांचा सन्मान जयदत्त क्षीरसागर यांनी केला होता. त्यामुळे आगमी काळात जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बीडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिणी गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण