Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) आणि ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु असतानाच, बजरंग सोनवणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी (Sharad Pawar Group Candidate) जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, सोनवणे यांच्या उमेदवारीनंतर ज्योती मेटे नेमकं काय निर्णय घेणार याची चर्चा रंगत असतानाच, स्वतः ज्योती मेटे यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसंग्राम भवन येथे ज्योती मेटे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election)  लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. 


राष्ट्रवादी शरद पवार गटाने ज्योती मिटे यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे शुक्रवारी बीडमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. शिवसंग्राम भवन या ठिकाणी झालेल्या बैठकीत ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवावी अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. तर, पदाधिकारी आणि जनतेत जाऊन त्यांचा कौल जाणून घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार असल्याचे ज्योती मेटे म्हणाल्या आहेत. जेव्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय होईल, तेव्हा माघार घेणार नसल्याचेही ज्योती मेटे म्हणाल्या आहेत. महाविकास आघाडीने मला उमेदवारी का नाकारली?, याचे उत्तर महाविकास आघाडीचे प्रमुख देऊ शकतात असे देखील त्या म्हणाल्या आहेत. 


ज्योती मेटेंची भूमिका महत्वाची असणार? 


महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे निवडणूक लढवणार की नाही याची चर्चा आहे. अशात पदाधिकारी आणि जनतेत जाऊन त्यांचा कौल जाणून घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हणत मेटे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे ज्योती मेटे लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास बीड जिल्ह्यात तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्योती मेटेंची भूमिका महत्वाची असणार आहे. 


महायुतीसाठी बीड मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे.


मागील काही वर्षात प्रत्येक लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघ नेहमीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यंदा भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप आणि महायुतीसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे. पंकजा मुंडे आणि दुसरीकडे महायुतीची घटक पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी लोकसभा निवडणूक महत्वाची बनली आहे. सोबतच बीड म्हणजेच मुंडे कुटुंब आणि आजही बीडचे राजकारणात मुंडे कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध करण्याचे देखील या दोन्ही बहिण भावासमोर आव्हान असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Beed Loksabha: ज्योती मेटेंच्या गाठीभेटींना वेग, आधी वंचितकडून उमेदवारीची चर्चा, आता इफ्तार पार्टीत मनोज जरांगेंना भेटल्या