Beed Rain : बीड (Beed) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील माजलगावच्या (Majalgaon) पद्मावती नदीला (Padmavati River) पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचं पाणी दगडी पुलावरून वाहत असल्याने दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळं अनेक नागरिक पुरामुळं अडकून पडले होते.
वडवणीत मुसळधार पाऊस
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. या पुरामुळं माजलगावच्या पद्मावती नदीला पूर आला आहे. त्यामुळ अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर तिकडे वडवणी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याने लऊळ येथील नदीला पूर आला आहे. त्यामुळं नागरिकांना नदीच्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत आहे. गुडगाभर पाण्यातून या नागरिक आपला जीव मुठीत घालून नदीवरच्या पुलावरुन वाट काढत आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी
राज्याच्या विविध भागात पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर कोकणातील रायगड, सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही (8 सप्टेंबर) राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.
प्रशासन मार्फत तयार केलेला गुजरवाडी-पात्रुड रस्त्यावरील पूल रात्री पडलेल्या पावसात वाहून गेला आहे. त्यामुळं गावकऱ्यांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नाही. प्रशासनाकडून पुलाबाबत काही मदत करावी, अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: