Pankaja Munde instructs Beed SP: बीडमधील उमापकिरण कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर आणि कडक कार्यवाही करा, अशा सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना केल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याशी फोनवर चर्चा करून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. ही घटना अतिशय संताप जनक आणि जिल्ह्याला काळीमा फासणारी असून शिक्षकांचे हे कृत्य गंभीर स्वरूपाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. क्लासेसमधील शिक्षक प्रशांत खटावकर आणि विजय पवार या दोघांनी सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे गेल्या वर्षापासून लैंगिक शोषण केले होते. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
बीडच्या क्लासमध्ये 17 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण
दरम्यान, खासगी कोचिंग क्लासेस मध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या मुलीकडून पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालय खरवंडी कासार येथे 11 वीचे अॅडमीशन घेतले असुन एप्रील 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीटचे क्लासेस लावले होते. सकाळी 09.00 ते 12.00 पर्यंत उज्वल अभ्यासिका येथे अभ्यासीका लावली होती व तेथे मी नेहमी अभ्यास करण्याकरीता जात असायचे.
जुलै 2024 पासून प्रशांत खाटोकर सर 12.00 वा.सु मी अभ्यासीकेमधुन बाहेर येण्याच्या टाईमला माझ्या अभ्यासीकेच्या खाली येवून थांबायचे व मला म्हणायचे तू माझ्यासोबत चल गाडीवर बस, तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे. क्लासेसचा टाईम दुपारी 2 ते दुपारी 6 पर्यंत असायचा. मी तेथे क्लास रेग्युलर करत होते. प्रशांत खाटोकर सर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानतर तेथील केबिनमध्ये एकटीला बोलवून ते माझी कीस घ्यायचे, माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरुम मध्ये कोणी नसताना तिथे सुध्दा ते मला किस करायचे व छातीला व इतर अंगाला बॅड टच करायचे. ते असे माझ्यासोबत वारंवार करत असायचे. मला धमकी द्यायचे की, तू जर घरी कोणाला सांगितले तर मी तुला मारुन टाकेन, अशी धमकी प्रशांत खाटोकर यांनी आपल्याला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या