Beed News बीड: बीडच्या आष्टी तालुक्यातून एक थरकाप उडवणारी घटना (Beed News) समोर आली आहे. बावी दरेवाडी येथे हिंस्र प्राण्याच्या हैदोस पाहायला मिळाला. गुरे चारण्यासाठी गेलेला राजू विश्वनाथ गोल्हार हा तरुण घरी परतलाच नाही. मात्र सकाळी त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अस्वस्थेत आढळून आला. त्याच्या शरीराचे अनेक भाग गायब दिसून आले. शिवाय शरीरावर दात आणि नखांचे व्रण आढळून आल्याने हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

Continues below advertisement

सध्या त्याचा मृतदेह आष्टीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच सदरचा प्रकार समोर येणार आहे. दरम्यान पाच वर्षापूर्वी याच परिसरात एका बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला चढवला होता. त्यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे हा हल्ला देखील बिबट्याने केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे.

बीडमधील आणखी एक धक्कादायक घटना- (Beed Crime News)

बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत शेतीचा वाद उफाळून आला. ज्यामध्ये एका 72 वर्षीय चुलत्याला तीन पुतण्यांसह सुनांनी कोयता लोखंडी पाईपने मारहाण केली. घटनेत गंभीर जखमी झालेल्या छबू देवकर वयोवृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटना आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावात घडलीय. या प्रकरणात अंभोरा पोलिसांनी सहा जणांना अटक केली. देवकर कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीचा वाद होता. हाच वाद उफाळून आला आणि दोन भावकीतील गट आपापसात भिडले यात वयोवृद्ध देवकर यांचा मृत्यू झाला. घटनेतील जखमींवर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींमध्ये वयोवृद्ध व्यक्तीच्या तीन पुतणे आणि तीन सुना अशा सहा जणांचा समावेश आहे.

Continues below advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Beed News : बीडच्या पवनचक्कीतील चोरी प्रकरणात आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई; बीड पोलीस पुन्हा ऍक्शन मोडवर