मुंबई: कृषी विभागाच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांना न्यायालयानं क्लिनचिट दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदी संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत. कराड प्रकरणातून मुंडेंना क्लिनचीट मिळाल्यानंतर त्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. त्यावरती आता करूणा शर्मा यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही अशा माणसाला मंत्रीपद देऊ नका, चांगल्या माणसाला मंत्रीपद द्या असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या करूणा मुंडे?
अजितदादा तुम्ही धनंजय मुंडे यांना परत मंत्रिपद देण्याची गोष्ट करत आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. पण धनंजय मुंडे लोकप्रतिनिधी नाही, ते फक्त त्यांचा विचार करतात. तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. ज्ञानेश्वरी मुंडेंचे पती महादेव मुंडेंची हत्या प्रकरणाबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणखी काही प्रकरण आहेत. जी गेल्या काही सहा ते सात महिन्यांपासून समोर आली आहेत. लोकांच्या समोर सर्व आलं आहे, त्यांनी शासन प्रशासनाचा गैरवापर करून यांनी काळा कारभार आणि साम्राज्य करून ठेवलं. हे तुम्हाला दिसलं आहे. गेल्या सहा सात महिन्यापासून तुम्ही पाहत आहात. तरी पण तुम्ही अशा घाणेरड्या व्यक्तीला मंत्रीपद देण्याची गोष्ट करत आहात. तुम्हाला इकडच्या जनतेचे दुःख दिसत नाही. जनप्रतिनिधी असताना महादेव मुंडे, संतोष देशमुख हत्या प्रकरण, माझ्या मुलाबाळांच्या काय अवस्था त्यांनी करून ठेवली होती, ती इथे येऊन पहा. तुम्हाला त्या माणसाच्या विरोधातील पुरावे हवे असतील तर मी देते. मला वेळ द्या मी सर्व घेऊन येते. ते एकदा पाहा, त्यानंतर तुम्ही विचार करा. अशा घाणेरड्या व्यक्तीला जर तुम्ही परत परत मंत्रीपद देत आहात, तर ते सहन करणार नाही आणि जर त्याचे दुःख दिसत नसले तर तुम्ही ज्ञानेश्वरी मुंडेंच्या परिवाराला, संतोष देशमुखांच्या परिवाराला, करूणा शर्माच्या परिवाराला विष द्या आणि नंतर धनंजय मुंडे मंत्रीपद द्या, असे पुढे करूणा शर्मा यांनी म्हटले आहे.
कोणत्याही चांगल्या माणसाला मंत्रीपद द्या, धनंजय मुंडे सारख्या माणसाला तुम्ही मंत्रीपद देण्याची गोष्ट करू नका, तुम्हाला जर याबाबतच्या पुरावे पाहिजे असतील तर मी तुमच्याकडे येते, तुम्ही मला वेळ द्या तुम्हाला सगळे पुरावे देते, तुम्ही ते सर्व बघा आणि नंतर विचार करा असेही पुढे करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. तुम्हाला येथील जनतेची दुख दिसत नाही. माझ्या मुलाबाळांची अवस्था काय करुन ठेवली आहे, त्यांनी ते येऊन बघा, हे महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. तुम्ही चांगल्या व्यक्तीला मंत्रीपद द्या, धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका. त्यांचे कार्यकर्ते अजूनही माजलेले आहेत, असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.