बीड: माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मंडे यांनी फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.  महिला डॉक्टरच्या पीडित कुटुंबाची माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांत्वन पर भेट घेतलीय. या भेटी दरम्यान कुटुंबाकडून सर्व घटनेची माहिती धनंजय मुंडे यांनी जाणून घेतली. या प्रकरणात प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा धनंजय  मुंडेंनी यांनी घेतला. 

Continues below advertisement

धनंजय मुंडेंची एसआयटी स्थापन करण्याची मागणी

पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. पीडित कुटुंबातील कोणताही व्यक्ती महिला डॉक्टरनं आत्महत्या केली हे मानायला तयार नाही, असं मुंडे यांनी सांगितलं. ही घटना घडण्यापूर्वी तिने लहान भावाला पीजी करण्यास जात प्रमाणपत्र काढण्यास सांगितले होते. दोन दिवस अगोदर एक डॉक्टर स्वत: ला पीजी करायचं आहे ती डॉक्टर आत्महत्या करु शकत नाही. जसा घरच्यांचा समज आहे, ही हत्या घडवून आणली आहे, याची चौकशी झाली पाहिजे.  मुख्यमंत्र्यांना एसआयटी स्थापन करण्यासाठी मागणी केली आहे. त्या एसआयटीमध्ये वरिष्ठ आयपीएस महिला अधिकारी असाव्यात. त्या जिल्ह्यातील तपास अधिकारी न ठेवता वरिष्ठ महिला तपास अधिकाऱ्यांकडून तपास व्हावा, असं धनजंय मुंडे म्हणाले.  

चार पाच पुढाऱ्यांनी बीडला बदनाम केलं :धनंजय मुंडे

महिला डॉक्टरला ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारच्या हिणवण्या झाल्या आणि ती ठराविक जाती समूहाची म्हणून हिणवण्या होत होत्या. या गोष्टीला कंटाळून आत्महत्या झाली की हत्या झाली हा भाग पोलीस तपासाचा आहे. ज्या चार पाच पुढाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्याला बदनाम केले. त्यावेळी बीड जिल्ह्यातील प्रत्येक जात, अठरा पगड जाती बदनाम होत होत्या. याच्यातील कोणी कोणी बाहेर शिकायला होतं, नोकरी करत होतं, त्याचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कोणी केला नाही. त्याला हे देखील कारणीभूत आहेत, नाहीतर हिणवण्या झाल्या नसत्या.  न समोर येणाऱ्या गुपचूपपणानं गाव सोडून कोसो किलोमीटरवर लोकं किती हिणवण्या सहन करत असतील त्याचा आज विचार केला पाहिजे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

Continues below advertisement

पोलिसांची चौकशी करावी

फलटण पोलिसांना एका प्रश्न विचारायचा आहे, ज्यावेळेस डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली त्यावेळी घरच्या लोकांना येऊ न देता मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी कशी हलवली असा प्रश्न आहे. डॉक्टर तरुणीच्या हातावरील हस्ताक्षर बहिणीचं नसल्याचं तिच्या बहिणीनं सांगितलं. या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते, त्यांची चौकशी झाली पाहिजे. आता जे काम करतायत तपासात त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत. इथं खासदारांच्या दोन पीएंचा संबंध जोडला गेला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

आता बीड जिल्हा, बीड जिल्ह्यातील भगिनीला न्याय देणार आहेत का? बीड जिल्ह्याची बदनामी करणार? कोणीतरी तोंड बांधून देणार आमच्या बहिणीवर वाटेल ते आरोप करणार, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. आम्ही एकटे डॉक्टरला न्याय देऊ शकत नाहीत तर त्यासाठी माध्यमांची गरज आहे, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

मारहाण झालेला मुकादम धनंजय मुंडेंनी समोर आणला

एका ऊसतोड मुकादमाला समोर आणून मुंडेंनी सातारा जिल्ह्यात असलेल्या कारखान्याकडून होणारी पिळवणूक समोर आणली. मुकादमाचे  नऊ दहा ट्रॅक्टर खासदाराच्या साखर कारखान्यावर राहिले असताना मुकादमाला बेदम मारहाण करण्यात आली. मरेपर्यंत मारल्यानं अॅडमिट करुन घ्यावं लागणार ही स्थिती डॉक्टर तरुणीवर आली. त्यावेळी ज्या खासदाराचा साखर कारखाना त्यांच्या पीएने डॉक्टरवर दबाव टाकला.  मुकादमाचा बीपी नॉर्मल आहे, हे सांगून त्यांना परत पाठवावा यासाठी पीएनं दबाव टाकला. आता मी शासनाला स्वस्त बसू देणार नाही मी मृत डॉक्टरला न्याय मिळवून देणारच, असं धनंजय मुंडे म्हणाले.