Dhananjay Munde Beed: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले आहेत. अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज आत खरी माहिती दडवल्याचा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी दाखल केला होता. याच तक्रारीवरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका दिलाय. धनंजय मुंडेंना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. एकीकडे राजीनामाच्या मागणीचा दबाव वाढत असताना दुसरीकडे न्यायालयाचा आदेश महत्त्वाचा मानला जातोय. (Parli Court)


विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. 


कधी होणार सुनावणी?


कोर्टाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीवर 24 फेब्रुवारी 2025 रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्र पाच फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर दाखल केली. त्यावरूनच न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे.


नक्की काय होते आरोप


फौजदारी न्यायालयामध्ये धनंजय मुंडे यांनी यांना कारणे दाखवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी २४ फेब्रुवारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे देखील तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितले आहे.  करुणा मुंडे यांनी याबाबत तक्रार अर्ज केलेला होत. या अर्जात निवडणूक उमेदवारी भरताना खरी माहिती दडवण्याचा आरोप आहे. धनंजय मुंडे यांनी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करुणा मुंडे यांच्या नावाच्या मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. या आरोपाखाली हा अर्ज करण्यात आला होता. यावरच कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.



दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणावरिल निकाल गुरुवारी (दि.6) वांद्रे कोर्टाने दिला. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी करुणा शर्मांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते. यानंतर विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी  परळी कोर्टात धनंजय मुंडेविरोधात तक्रार दाखल केली होती.


हेही वाचा :


काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड