बीड : मराठा समाजाबद्दल चुकीची पोस्ट करून समाजाच्या भावना दुखावल्याने बीड (Beed) मधील सराफा व्यापारी मंगेश लोळगे यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभेला सराफा व्यापाऱ्यांनी पाठिंबा देण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याच बंदला मंगेश लोळगे यांनी विरोध करत मराठा समाजाबद्दल चुकीची पोस्ट करून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी राहुल वायकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, मंगेश लोळगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय आहे प्रकरण? 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची 14 ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी गावात सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या सभेला राज्यभरातून पाठींबा मिळत होता. दरम्यान, बीड जिल्ह्यातील अनेक संघटनांनी देखील या सभेला पाठींबा दर्शवला होता. तर, मनोज जरांगे यांच्या सभेला बीडच्या सराफा व्यापाऱ्यांनी पाठिंबा देण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान याबाबत सराफा व्यापाऱ्यांच्या ग्रुपवर पोस्ट टाकण्यात आली होती. याच पोस्टला उत्तर देतांना मंगेश लोळगे यांनी विरोध करत मराठा समाजाबद्दल चुकीची पोस्ट केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मंगेश लोळगे यांच्या पोस्टमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगेश लोळगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मराठा आरक्षणाच्या मागणीला सराफा व्यापाऱ्यांचा पाठिंबा


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन होत आहे. तर, मनोज जरांगे यांनी देखील आंतरवाली सराटी गावात सभा घेऊन सरकारला पुढील 10 दिवसांत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी इतर समाजाकडून देखील पाठींबा देण्यात येत आहे. तर अनेक संघटनांनी देखील या मागणीला पाठींबा दिला आहे. बीड जिल्ह्यात देखील अनेक संघटना मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी देखील या मागणीला पाठींबा दिला आहे. सोबतच सराफा व्यापाऱ्यांकडून देखील मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देण्यात आला आहे. तर, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये देखील सराफा व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत आपली दुकाने बंद ठेवली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Prasad Lad On Manoj Jarange Patil : तुमचा बोलविता धनी कोण, मुघलांप्रमाणे समाजात फुट पाडू नका; प्रसाद लाड यांचा जरांगेंवर निशाणा