Beed: बीडच्या आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात केवळ कागदोपत्री पूल दाखवून दहा लाखांचा निधी लाटण्याचा प्रकार समोर आला होता.. दरम्यान ही बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती. याची दखल घेत प्रशासनाने पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात केलीय.. आष्टी तालुक्यातील तवलवाडी ते देवीगव्हाण या गावांना जोडणाऱ्या नदीवर दहा लाखांचा पूल मंजूर करण्यात आला. परंतु वर्षभरापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिल देखील उचलण्यात आले.. या पुलाची निर्मिती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती.. तसेच राहुल जगताप या तरुणांने देखील बेमुदत उपोषण सुरू केले.. दरम्यान या सर्वाची दखल घेत प्रशासन कामाला लागले आहे.. (Suresh Dhas)
नेमकं प्रकरण काय?
केवळ कागदोपत्री पूल दाखवून निधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला होता. आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील ही गंभीर बाब एबीपी माझाने प्रकाशझोतात आणली आणि अखेर प्रशासनाला जाग आली. ग्रामस्थांच्या संघर्षानंतर आणि माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. ही घटना आहे आष्टी तालुक्यातील तवलवाडी ते देवीगव्हाण या दोन गावांना जोडणाऱ्या नदीची. या ठिकाणी सुमारे दहा लाखांचा पूल मंजूर झाला होता. मात्र वर्षभरापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण झाल्याचे दाखवत अधिकाऱ्यांनी बिल उचलले होते. प्रत्यक्षात त्या ठिकाणी कुठलाही पूल नव्हता, त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यात नदी पार करणे अवघड व्हायचे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती.
ही बाब समोर आल्यानंतर तवलवाडीतील युवक राहुल जगताप याने थेट बेमुदत उपोषण सुरू केलं. एबीपी माझाने ही बातमी प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनालाही दखल घ्यावी लागली. त्यानंतर अखेर प्रशासनाने हालचाल सुरू करत पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. सध्या त्या ठिकाणी मातीचा भर टाकण्याचं काम सुरू आहे. गावकऱ्यांनी आणि उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या या पावलंवर समाधान व्यक्त केलं आहे, मात्र काम पूर्ण होईपर्यंत लक्ष ठेवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा