बीड : कोळशापासून (Coal) विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील (Parali Thermal Power Station) ऐतिहासिक चिमणी (Chimney) आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार व पाच हे बंद करण्यात आलेले आहेत. 210 मेगाव्हेट वीज निर्मितीचे हे तीन संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारे सगळी सामग्री सुद्धा आता भंगरात काढण्याचं काम सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणीच्या चिमणीतून कोळशाचा धूर बाहेर काढला जायचा आणि खरंतर परळी शहराची ओळख अगदी या चिमणी वरून ओळखली जायची ती चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली आहे. इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते. त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती जी आज इतिहास जमा होणार आहे


चिमणी परळी शहराची ओळख


प्रत्येक शहराची ओळख एक वेगळ्या वास्तूने होत असते तशी परळीची ओळख ही थर्मल पॉवर स्टेशनमुळे नक्कीच वेगळी आहे. हे थर्मल पावर स्टेशन जरी बंदिस्त असले तरी या थर्मल पॉवर स्टेशनमधून निघणारा जो काही धूर आहे तो बाहेर सोडण्यासाठी उंच मनोऱ्यासारख्या उभ्या असलेल्या या चिमण्या लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. या चिमण्यांपैकी एक असलेली सर्वात जुनी चिमणी आता इतिहास जमा झाली.


परळीचे औष्णिक विद्युत केंद्र हे मराठवाड्यातील एकमेव कोषापासून विद्युत निर्मिती करणारे केंद्र आहे. 1971 साली या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची स्थापना झाली. त्यावेळी धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. 1971 पासून या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण आठ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक ,दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे तीन संच निकामी झाल्यानंतर नवीन संच उभा करून त्यातून सध्या परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून विद्युत निर्मिती होत आहे.


मागच्या काही दिवसापासूनच कालावधी संपलेल्या साधून सामोरील बाजूला करण्याचे काम चालू होते यातच ही चिमणी पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात येत आहेत. आज शेवटच्या टप्प्यात संच क्रमांक तीनची धुरवाहक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन एप्रिल 1979 मध्ये सुरू करण्यात आला होता. 


2010 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 3 चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅप मध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने 2015 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर सन 2019 पूर्वी हा संच स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला यापूर्वी महाजन कोणी परळी औष्णिक उद्योग केंद्रातील 30 मेटाबॅटचे दोन संच स्क्रॅच मध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार पाच हे तीन संच 2019 पासून बंद आहेत त्यापैकी संच क्रमांक तीन ची 120 फूट उंचीची चिमणी आज सकाळी पाडण्यात आली आहे.