Beed News : बाजार भाव पडल्याने कांद्याने (Onion) शेतकऱ्यांच्या (Farmers) डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे. कांद्याला चांगला भाव सोडा आगदी बाजारात कांदे विकायला सुद्धा परवडत नसल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असाच काही अनुभव आला असून, साडेतीन टन कांदा विकून रुपया देखील हातात आला नाही. उलट कांदा विकून व्यापाऱ्याला 1800 रुपये देण्याची वेळ आली. त्यामुळे अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांने कसं जगावं असा प्रश्न हताश झालेल्या शेतकऱ्याला पडला आहे. भागवत सोपान डांबे (रा. जैताळवाडी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 


कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे त्या कांद्यापासून होणारा फायदा सोडा अगदी मार्केटमध्ये कांदा घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला रुपया देखील हातात पडत नाही.  कारण साडेतीन टन कांदा विकून बीडचा शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नाही. उलट अठराशे रुपये अडत व्यापाऱ्याला देण्याची वेळ बीड तालुक्यातील जैताळवाडी येथील भागवत सोपान डांबे या शेतकऱ्या वर आली आहे. 70 हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. डांबे यांच्या कांद्याला 50 रुपये क्विंटल भाव मिळाला. त्यामुळे 1550 किलो कांद्याचे 775 रुपये आले. बाजारातील हमाली, तोलाई आणि इतर खर्च 2158 रुपये झाला. त्यामुळे तीन टन कांदा विकूनही डांबे यांना अडत्याला पदराचे 2383 रुपये देण्याची वेळ आली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Onion Price : शेतकऱ्याची थट्टा! 825 किलो कांदा विकला, पण पदरचाच एक रुपया द्यावा लागला