बीड : राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत वाढल्याचं पाहायला मिळत असून विविध अपघातात अनेक ठिकाणी प्रवाशांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातही अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची (Accident) घटना घडली. केज-अंबाजोगाई रोडवर भरधाव वेगातील कारने एका पायी जाणाऱ्या मुलाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. तसेच, घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही (Police) देण्यात आली. दरम्यान, अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रोडवरल भरधाव वेगातील कारने मुलाला धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. त्यामध्ये, पायी चालणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला असून कारमधील दोघेजण देखील जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. गेल्या काही दिवसात अंबाजोगाई रोडवर अपघाताच्या घटना वाढल्या असून या मागील कारण शोधणं व उपाय करणे गरजेचं आहे. 

रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन

बीड जिल्ह्यातील माजलगावच्या जायकोचीवाडी येथील रस्त्यासाठी खामगाव पंढरपूर महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आल. गेल्या 35 वर्षांपासून जायकोचीवाडी ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत असून याचा त्रास गावातील गर्भवती महिला, शाळेतील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. त्याच बरोबर पुरूषोत्तमपुरी रस्त्यात आलेले अतिक्रमण काढण्यात यावे, जायकोची वाडी फाट्यावर थांबा देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी आझाद क्रांती सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Continues below advertisement

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहि‍णींना खुशखबर; 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज, तेही शून्य टक्के व्याजदराने