Beed: लेकीच्या लग्नासाठी मल्टीस्टेटमध्ये अडकलेली ठेव परत न मिळाल्याने गेवराई येथील 46 वर्षीय वडिलांनी मल्टीस्टेटच्या दारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनासमोर आल्यानंतर बीड मधील मल्टीस्टेटच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेय . गेल्या दीड वर्षात जवळपास 10 मल्टीस्टेटने गाशा गुंडाळलाय . यात शेकडो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत . आपल्या आयुष्याची जमापुंजी ठेवणारे अनेक ठेवीदार अडचणीत सापडले आहेत . जास्त व्याजदराचा अमिष दाखवून ठेवीदारांना आकर्षित करणाऱ्या मल्टीस्टेटच्या कारभारावर आता तरी वचक बसणार का ?हे पाहणं महत्त्वाचं ठरेल .
जीवही गेला अन् आयुष्यभराची जमापुंजीही...
लेकीच्या लग्नासाठी मल्टीस्टेटमध्ये अडकलेली ठेव वारंवार बँकेच्या फेऱ्या मारूनही परत न मिळाल्याने हतबल झालेल्या सुरेश आत्माराम जाधव या गेवराई तालुक्यातल्या 46 वर्षीय वडिलांनी मल्टीस्टेटच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली . सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेटमध्ये 2020 ला मुलांच्या शिक्षणासाठी 11 लाख 50 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवली होती . परंतु मागील दीड वर्षात जिल्ह्यातील जवळपास दहा मल्टीस्टेटने गाशा गुंडाळला .आयुष्यभराची जमापुंजी म्हणून ठेवलेले पैसे परत मिळावे यासाठी सुरेश जाधव दोन महिन्यांपासून मल्टीस्टेटचे उंबरठे झिजवत होते .यापूर्वी देखील त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता .त्यामुळेच मल्टीस्टेटने अडीच लाख रुपये त्यांना परत दिले .मात्र उर्वरित नऊ लाख रुपये मिळावे यासाठी सुरेश जाधव आपल्या कुटुंबासमवेत वारंवार मल्टीस्टेटमध्ये जात होते .
अखेर जाधव यांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास छत्रपती मल्टीस्टेटच्या दारासमोर गळफास लावून आत्महत्या केली .याप्रकरणी तक्रारदार कविता सुरेश जाधव यांच्या तक्रारीवरून आरोपी संतोष उर्फ नाना बसंत भंडारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .प्रशासनाला आणखी किती बळी घ्यायचेत ?असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत आहे .मागील दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास 11 मल्टीस्टेटने गाशा गुंडाळला.
गेल्या दीड वर्षात 11 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला
ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मां साहेब जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट, मातोश्री मल्टीस्टेट, शुभ कल्याण मल्टीस्टेट, परिवर्तन मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, मंगलनाथ मल्टीस्टेट आणि गंगाभारती मल्टीस्टेट यांचा समावेश आहे.. यात जवळपास शेकडो ठेवीदारांच्या साडेपाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. जादा व्याजदराचे आमिष दाखवून या मल्टीस्टेटने ठेविदारांना आकर्षित केलं होतं.. त्यामुळे आपल्या आयुष्याची जमापुंजी कोणत्या ठिकाणी ठेवताय याची खात्री नक्की करा... कारण आपल्या आयुष्याची कमाई या मल्टीस्टेट मध्ये ठेवताना सुरेश जाधव यांनी खात्री केली असती तर कदाचित त्यांचा प्राण वाचला असता...
हेही वाचा
बँकेच्या गेटवर गळफास, लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात, चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल