बीड: पोलिस खात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. धाराशिव येथील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे याने बीडच्या एका विवाहित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे. (Beed Crime News)

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2013 पासून बीड पोलिस दलात कार्यरत असलेल्या शिंदेची ओळख विवाहितेशी झाली (Beed Crime News). ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर शिंदेने पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करत स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. बीडहून धाराशिवला बदली झाल्यावरही त्याने वारंवार पिस्तुलाच्या धाकावर अत्याचार केला, शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने धाराशिव येथे सोबत राहण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. आरोपीस अद्याप अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. (Beed Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला आणि रवींद्र शिंदे यांची घरे शेजारी असल्याने त्यांची जुनीच ओळख होती. रवींद्र शिंदे याची पोलिस खात्यात पोलिस उपरीक्षक पदावर निवड झाल्यानंतर तो जिल्ह्याबाहेर गेला. मात्र, तो पिडीतेशी कायम संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला 2013 मध्ये रात्रीच्या वेळी बळजबरीने घरात घुसून त्याने बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार (Beed Crime News) केला आणि पिडीतेचे नग्न व्हिडीओ आणि फोटो काढल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या बद्दल कोणाला सांगितले तर तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकण्याची धमकीही त्याने दिली. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या पोलिस अधिकाऱ्याने वारंवार अत्याचार केल्यानंतर पिडीता गर्भवती राहली होती.(Beed Crime News)

त्यानंतर त्याने त्या महिलेला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. त्यानंतर ता.1 जुन रोजी पुन्हा तो पिडीतेच्या घरात शिरला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. तर, ता. 1 जुलै रोजी तुला व तुझ्या कुटूंबाला जिवे मारुन टाकण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे पिडीतेने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.(Beed Crime News)