Beed Crime:  बीडच्या सिरसाळा येथे पोलिसांनी कारवाई करत विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे.सिरसाळा - मोहा रस्त्यावरील खदानी जवळ ही कारवाई करण्यात आलीय. कारवाईत जप्त केलेले पिस्तूल राम धोत्रे याने करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार यांच्याकडून खरेदी केले होते.सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.दरम्यान या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. (Beed Crime News)

Continues below advertisement


मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारीचे एक एक कारनामे उघड झाले. हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचारासह किरकोळ कारणांवरून होणारी मारहाण, गावठी कट्टा, बंदुकींमधून गोळीबार करत सुरु असलेली दहशत असे कितीतरी प्रकार समोर आले. सर्रास वाटप होणाऱ्या बंदुकींचे परवाने आणि हौस म्हणून बंदूक वापरणाऱ्यांची चर्चा रंगली. दरम्यान, आता बीडच्या सिरसाळ्यात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तिघांनी पोलिसांनी पकडलं आहे. 


कट्ट्याची खरेदी करणाऱ्याचं नाव तपासात उघड


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये राम धोत्रे, करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार यांचा समावेश आहे. यामधील राम धोत्रे याने हा गावठी कट्टा करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. संशयितांकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केलं असून, त्यांच्याकडे आणखी कोणते हत्यार होते का, याचा तपास सुरू आहे.


या संपूर्ण प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.


बीडमध्ये पोलीस खात्याला काळीमा फासणारी घटना


पोलिस खात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आलीय. धाराशिव येथील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे याने बीडच्या एका विवाहित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2013 पासून बीड पोलिस दलात कार्यरत असलेल्या शिंदेची ओळख विवाहितेशी झाली. ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर शिंदेने पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करत स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालीय.


हेही वाचा


Daund Kala Kendra Firing : दौंडच्या कलाकेंद्रातील गोळीबार प्रकरणी अजितदादांच्या आमदाराच्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात; गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?