बीड : बीड जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2024 या गतवर्षात सायबर भामट्यांनी 9 कोटी 39 लाख रुपये हडपले आहेत. त्यातील केवळ 87 लाख 29 हजार रुपये परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आलं आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेच्या निलंबनापासून सायबर विभाग चर्चेत आहे. अशातच कासलेनंतर मागील आठवड्यात दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
एकूण 90 गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल
2024 मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक झाली असून यामध्ये बोगस वेबसाईट, बोगस कस्टमर केअर, बोगस लिंक, लॉन ॲप इतर माध्यमातून फसवणूक झाली. या प्रकरणात एकूण 90 गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या घटनांमुळे पोलिस प्रशासन सतर्क झालं आहे. अशा गुन्ह्यामध्ये सापडणाऱ्या कडक शिक्षा करण्याची मागणी देखील केली जात आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी धाराशिवमध्ये दूध डेअरी चालकाची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका दूध डेअरी चालकाची (Milk Dairy operator) लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Online fraud) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तानाजी दत्तु भोसले असं ऑनलाईन फसवणूक झालेल्या दूध डेअरी चालकाचं नाव आहे. 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दूध डेअरी चालक तानाजी दत्तु भोसले यांना व्हाट्सऍप फाईल पाठवण्यात आली. त्यानंतर ती फाईल डॉउनलोड केली व दूध संस्थेच्या खात्यातील पैसे लुटण्यात आले. भोसले यांच्या मोबाईलवर बॅकेतून बोलत आहे असे सांगून तुमचे आय. सी. आय. बँक खाते आपडेट करायचे आहे असा बनाव करुन आधार कार्ड व पॅन कार्डची माहिती घेण्यात आली. तसेच व्हॉटसअपवर आय डी बी आय बँक एक फाईल पाठवून ती डाउनलोड करण्यास लावले. यानंतर येडेश्वरी दुध डेअरीचे आयसीआयसीआय बँक खात्यातून 24 लाख 47 हजार 557 रुपये ऑनलाईन फसवणूक करुन काढनू घेण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्रास मोबाईलवरुनच फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. विविध कारणं सांगून नागरिकांना विश्वासात घेतलं जातं. त्यानंतर त्यांच्याकडून बँकेच्या खात्यासंदर्भात माहिती घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी गुन्ह्यांची नोंद देखील करण्यात आली आहे. दरम्यान, असा गुन्ह्यात फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या: