Beed Crime: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि काहीशी अजब घटना समोर आली आहे. आधीच दोन विवाह झालेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीशी तिसरे लग्न करण्याची तयारी केली.  लग्न देखील लागले. मात्र पहिल्या पत्नीला पतीच्या तिसऱ्या बालविवाहाचा सुगावा लागल्याने आरोपीने ऐन मांडवात दुसऱ्यालाच बोहल्यावर चढवून स्वतः तिथून पळ काढल्याची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलीशी बालविवाह करणाऱ्या आरोपीचे नाव सुलेमान पठाण असे आहे. 

या बालविवाहाची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र तोपर्यंत आरोपींसह सर्वांनी पळ काढला होता. मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईलने गाडीचा पाठलाग करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काझीसह एकूण 22 जणांवर गुन्हा दाखल केला. 

नेमके प्रकरण काय? 

बीडमध्ये  आधीच दोन विवाह झालेले असताना सुलेमान पठाण या आरोपीने अल्पवयीन मुलीशी विवाह करण्याची तयारी केली. लग्न देखील लागले. मात्र,  तिसऱ्या बालविवाहाची माहिती पहिल्या पत्नीला कळाली आणि सुलेमान पठाणचा तिसऱ्या लग्नावर पाणी फिरलं. पहिल्या पत्नीला नवऱ्याच्या तिसऱ्या लग्नाची माहिती मिळाल्याने सुलेमान पठाणणे बहिणीच्या गावातील आसिफ शेख ला लग्नाच्या बोलावर चढवले आणि स्वतः मांडवातून पळ काढला. सुलेमान चा पहिला पत्नीसोबत वाद आहे. सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याच प्रकरणात त्याच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर करण्यात आला होता. 

दरम्यान, या बालविवाहाची माहिती पोलिसांनाही मिळाली. मात्र तोपर्यंत आरोपी सह सर्वांनी पळ काढला. पण पोलिसांनी फिल्मी स्टाईलने गाडीचा पाठलाग करत आरोपिंना ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलिसांनी उपस्थित काझीसह एकूण 22 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवला असून सुलेमानला ताब्यात घेतलं आहे.

नवरा सोडला BF धरला, तरुणीनं जन्मदात्याला संपवलं

मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शंकर रामचंद्र कांबळे (58) असे मृत वडिलांचे नाव आहे. मुलीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणातून मुलीने प्रियकराच्या साथीने वडिलांचा काटा काढला आहे. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात  मुलगी सोनाली बैत (37)आणि तिचा प्रियकर महेश पांडे (27) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. 

हेही वाचा:

प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला थंड काळजानं संपवलं, राजाच्या पिंडदानानंतर सोनमच्या भावाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, हे नातं आधीच कळलं असतं तर...