बीड : राष्ट्रवादीत (NCP) दोन गट झाल्यावर आता एकेमकांना सभेतून उत्तर दिले जात आहे. दरम्यान मागील आठवड्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यात सभा घेतली होती. त्यांच्या याच सभेला उत्तर देण्यासाठी उद्या (17 ऑगस्ट) रोजी अजित पवार बीडमध्ये सभा घेत आहे. तर या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शरद पवारांच्या सभेला उत्तर देणारी ही सभा असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या सभेत अजित पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. मात्र, ही उत्तर सभा नसणार असल्याचे धनंजय मुंडे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


बीडमध्ये उद्या अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. शरद पवार यांची सभा झाल्यानंतर अजित पवार यांची सभा उत्तर सभा होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ही सभा विकासाच्या मुद्द्यावर होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या स्वागतासाठी बीड शहरात भव्य असे बॅनर्स आणि स्वागत कमान उभ्या करण्यात आले आहेत. तर, या सभेसाठी बीड शहरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर भव्य असा वॉटरप्रूफ मंडप देखील उभारण्यात आला आहे.


या सभेसाठी अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच शरद पवारांच्या सभेला झालेल्या गर्दीपेक्षा अधिक गर्दी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केली जाणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सभेनंतर आता या सभेमध्ये अजित पवार नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, अजित पवार यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून, उद्याच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 


अजित पवार हे शरद पवारांवर बोलणार? 


17 ऑगस्ट रोजी शरद पवार यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेतून शरद पवार हे धनंजय मुंडे आणि अजित पवारांवर निशाणा साधतील अशी चर्चा होती. पण, शरद पवारांनी ना अजित दादावर टीका केली, ना धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या सभेतून अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर धनंजय मुंडे यांच्या भाषणात देखील काय मुद्दे असणार हे सुद्धा पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


अखेर ठरलं! शरद पवारांच्या बीडच्या सभेला अजित पवारांकडून मिळणार अशाप्रकारे उत्तर; याबाबत मंत्रालयात झाली बैठक