Ajit Pawar in Beed: बीडमधील परळी येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शिवराज दिवटे (Shivraj Divate) या तरुणाला समाधान मुंडे (Samadhan Munde) आणि त्याच्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या टोळक्याने त्याचे अपहरण करून त्याला डोंगराळ भागात नेले आणि बांबू व लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात (Beed Crime) खळबळ उडाली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवराज दिवटे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज (दि. 19) बीड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अजित पवार हे शिवराज दिवटेची घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अजित पवार यांनी शिवराज दिवटे याची भेट न घेताच ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी संताप व्यक्त केलाय.
परळीला मारहाण झालेला शिवराज दिवटे याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच ठिकाणी आज अजित पवार हे बैठकीसाठी आले होते. अजित पवार हे शिवराज दिवटेची भेट घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अजित पवार हे शिवराज दिवटे याची भेट न घेताच ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातून निघून गेले. अजित पवार यांच्या दौऱ्यात दिवटे याची भेट नव्हती. पण, अजित पवार यांनी बैठक घेतलेल्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये शिवराज दिवटे याच्यावर उपचार सुरु होते. मात्र अजित पवारांनी शिवराज दिवटे याची भेट घेतली नाही. दरम्यान, स्वामी रामानंद तीर्थ बाह्य विभागाची नूतनीकृत इमारत, मुलांच्या वस्तीगृहाच्या नूतनीकृत इमारतीची पाहणी, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय बी-बिल्डींग सर्जिकल वार्ड आणि नूतन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र ही पाहणी व उद्घाटन न करताच अजित पवार हे पुढच्या कार्यक्रमासाठी झाले.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संतापले
यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी संताप व्यक्त केलाय. अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि बारामतीचा विकासाचा विषय आल्यानंतर अजित पवार सक्रिय होतात तर बीडच्या विकासावर मात्र दादा संवेदनाहीन होतात. दादा अत्यंत कोत्या मनाचे आहेत. त्यामुळे शिवराज दिवटे या तरुणाला भेटण्यास गेले नाही. म्हणून आम्ही अजित पवार यांचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.
आणखी वाचा
नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखले, अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा रुग्णांना फटका