बीड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश घेऊन भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. सरकार देशमुख कुटुंबीयांसोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचं यावेळी अभिमन्यू पवार यांनी सांगितलं. तसेच मतदारसंघामध्ये जमा झालेला निधी त्यांनी देशमुख कुटुंबीयांना सुपूर्त केला

Continues below advertisement

संतोष देशमुख प्रकरणात राज्य सरकार जे पाऊल उचलत आहे त्याची माहिती अभिमन्यू पवार यांनी दिली. त्यावर देशमुख कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं. पण काही बाबतीत देशमुख कुटुंबीयांना प्रश्न आहेत, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाणार असल्याचं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं.  

अभिमन्यू पवार म्हणाले की, "देशमुख कुटुंब यांच्या नव्या मागण्या आहेत त्यावर नक्कीच विचार केला जाईल. सरपंच देशमुख यांची हत्या नसून ती माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडली आहे. उज्वल निकम यांच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. त्यांच्या तावडीतून आरोपी सुटणार नाहीत. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाईल."

Continues below advertisement

धनंजय देशमुखांनी घेतली अजित पवारांची भेट

बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. गेल्या तीन महिन्यातील प्रशासनाच्या गोंधळाबाबतची माहिती देशमुखांनी अजित पवारांनी दिली. यावेळी जिल्हा न्यायालयातील आरोपींच्या हाणामारी बाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.

धनंजय देशमुख प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक उणिवा राहिल्या असून त्याचा पुन्हा एकदा तपास करण्यात यावा अशी मागमी धनंजय देशमुखांनी अजित पवारांकडे केली असल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना बीडसोडून इतरत्र हलवण्याच्या मागणीसह इतर मागण्यांचा मसुदा धनंजय देशमुखांनी अजितदादांना दिला.

बीडमधील दादागिरी, अजितदादांचा इशारा

बीड दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांच्या स्टाईलनं कानउघाडणीही केली. संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीडमधली गुंडगिरी आणि राजकीय हितसंबंध समोर आलेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना अजितदादांनी बीडला सुतासारखं सरळ करण्याचा इशारा दिला. बीडमधले अधिकारी निगरगट्ट झालेत त्यांना बदलावं लागेल, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. पक्षात कार्यकर्त्यांनी काय करावं, कसं वागावं याचा सल्ला त्यांनी दिला. आताचे नेते पाया पडण्याच्या लायकीचे नसल्याचं सांगत पाया कुणाच्य़ा पडायच्या याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं. 

ही बातमी वाचा: