Beed Crime News : एका मेंढपाळ तरुणाच्या हत्येने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला (Beed Crime) आहे. पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील दगडवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाची निघृणपणे हत्या (Crime) करण्यात आलीय. दीपक केरा बिल्ला असे मेंढपाळ तरुणाचे नाव असून हत्ये मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून (Beed Crime News) सध्या पंचनामा केला जातोय.
तीन दिवसातील दुसरी हत्येची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृतक दीपक बिल्ला हा मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी तो मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये आला होता. शिरूर तालुक्यातील दगडवाडी परिसरात त्याचे वास्तव्य होते. आज पहाटे अज्ञातानी त्याची हत्या केल्याचं समोर आलंय. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाची हत्या झाली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मेंढपाळ तरुणाच्या हत्येने बीड हदरले आहे. तर जिल्ह्यात वारंवार सुरू असलेल्या खून, हाणामारी, आणि गुन्हेगारीच्या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार घडत असलेल्या घटनेने ऐरणीवर आला आहे.
शिक्षकेच्या तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद सदस्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
बीडच्या माजी जिल्हा परिषद सदस्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षकेने दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. नारायण शिंदे असं माजी जिल्हा परिषद सदस्याचे नाव असून तो दोन्ही राष्ट्रवादीत सक्रिय कार्यकर्ता आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडीतेने दिलेल्या तक्रारीवरून एप्रिल 2006 ते डिसेंबर 2022 या कालावधीत बीडसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नारायण शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून फ्लॅटसाठी आणि इतर कामासाठी पैसे मागितले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याच तक्रारीवरून नारायण शिंदे याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 376, 376 (2) (एन), 406, 506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत.
हे देखील वाचा: