Beed Crime News : बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगीक छळ प्रकरणात कोठडीत असणाऱ्या आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांची तपास अधिकाऱ्यांनी तब्बल 10 तास चौकशी केलीय. तर या दोघांच्या मोबाईलचे सीडीआर काढण्याचे काम सुरु असून इंटरनेट वापरकर्त्यांनाही पत्र देण्यात आले आहे. आज (1 जुलै) या दोन्ही शिक्षकांची पोलीस कोठडी संपणार असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

उमाकिरण शैक्षणिक संकुलात नीटची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थीनीचा लैंगीक छळ केल्यावरुन संचालक विजय पवार आणि शिक्षक प्रशांत खाटोकर या दोघांवर पोक्सोनुसार गुन्हा नोंद आहे. सध्या दोघेही पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षकांकडून शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे सोपविण्यात आला.

बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रात्र घालविलेल्या पवार, खाटोकरला शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. इथे दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून त्यांचा सीडीआर तपासला जात आहे. तसेच इंटरनेटचा वापर करुन काही कृत्य केले का, याबाबत तपास अधिकाऱ्यांनी इंटरनेट वापरकर्त्यांनाही पत्र दिले आहे. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपणार असून दुपारी या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बीड पोलिसांचे आवाहन

दरम्यान,  सदर प्रकरणाबाबत आणखी कोणी पीडित असेल किंवा कुणाला काही अधिक माहिती अथवा पुरावे सादर करायचे असतील तर त्यांनी पोलीस अधीक्षक किंवा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे. माहिती व पुरावे सादर करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार असल्याची हमी देखील बीड पोलिसांनी दिली आहे.

दुसरीकडे, अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी यांच्या मार्फत चौकशी आणि तपास पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांकडे लेखी अर्जाद्वारे ही मागणी करण्यात आली असून सध्या सुरू असलेल्या तपासावर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी असमाधान व्यक्त केलं आहे. 

लेकीचा झालेला छळ ऐकून आई-वडिल धाय मोकलून रडले

सोमवारी पीडीतेला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. यावेळी तिने समितीसमोर सगळा घटनाक्रम उलगडला. खाटोकरने तिला सर्वाधिक त्रास दिला. वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर त्याचे माझ्याशी वागणे चांगले नव्हते. हिने मला एक प्रश्न विचारला आहे. त्याचे उत्तर मी देणार आहे. असे म्हणून तो क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावत होता. तो ऐकत नव्हता, तर विजय पवारने हाच प्रकार केल्याचे पीडीतेने म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या