Sitaare Zameen Par Box Office Collection Day 11: आमिर खानचा (Aamir Khan) 'सितार जमीन पर' (Sitaare Zameen Par) 20 जून रोजी रिलीज करण्यात आला. त्यावेळी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' (Housefull 5) चित्रपट आधीच थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला आणि तो बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धमाल करत होता. धनुषचा (Dhanush) 'कुबेरा' (Kubera Movie) देखील या चित्रपटासोबत प्रदर्शित झाला होता.

'सितार जमीन पर'नं त्याच्या आशयामुळे या दोन दिग्गजांच्या चित्रपटांना मागे टाकलं. चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा ओलांडून एकामागून एक अनेक रेकॉर्ड रचले. चित्रपट प्रदर्शित होऊन 11 दिवस उलटलेत, तर चला जाणून घेऊया आतापर्यंत चित्रपटानं किती कमाई केली आहे. 

'सितार जमीन पर'चा बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिल्या आठवड्यात चित्रपटाची कमाई 88.49 कोटी रुपये होती. दुसऱ्या आठवड्यात 33.98 कोटी रुपये कमाई करताना, चित्रपटानं 10 दिवसांत एकूण 122.47 कोटी रुपये कमाई केली आहे.

सॅक्निल्कच्या मते, अकराव्या दिवशी रात्री 10:30 वाजेपर्यंत चित्रपटानं 3.75 कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे एकूण 126.40 कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान, लक्षात ठेवा की हे आकडे अंतिम नाहीत. त्यात बदल होऊ शकतात.

'सितारे जमीन पर'चं बजेट आणि वर्ल्डवाईड कलेक्शन

अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, आमिर खानचा चित्रपट सुमारे 90 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. सॅक्निल्कमधील अपडेटेड 10 दिवसांच्या जगभरातील कलेक्शन डेटानुसार, चित्रपटानं 198 कोटी रुपये कमावले आहेत. जर आजचं देशांतर्गत कलेक्शन यात जोडलं, तर तो 200 कोटी रुपयांच्या वर पोहोचतं. यासह, हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा ओलांडणारा या वर्षी प्रदर्शित होणारा चौथा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Hemant Dhome On Hindi Language Compaltion: 'लढाई संपलेली नाही… हा विजय नाही, तहात हरायचं नाही'; हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल