Ola Electric Bikes: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आपली भक्कम जागा निर्माण केल्यानंतर ओला आता इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. कंपनी एक, दोन नाही तर तब्बल पाच इलेक्ट्रिक बाईक आणण्याच्या तयारीत आहे. यासोबतच ओला इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये दमदार एंट्री करणार आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्यानंतर मोठा धमाका झाला होता, आताही तसेच काही बाजारात होऊ शकतं, या बाईकमध्ये कंपनी कोणते संभाव्य फीचर्स देऊ शकते, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...


Ola Electric Bikes: सगळ्या सेगमेंटमध्ये उतरण्याची तयारी 


आगामी काळात ओला जवळजवळ सर्व सेगमेंटमध्ये बाईक आणेल. म्हणूनच कंपनी पाच वेगवेगळ्या पॉवर आणि डिझाइन इलेक्ट्रिक बाईक्सवर काम करत आहे. ज्याची झलक ओलाने जारी केलेल्या टीझरमध्ये पाहायला मिळते. लवकरच ओलाच्या प्रोडक्शन रेडी व्हेरिएंटचे उत्पादन सुरू केले जाऊ शकते.


Ola Electric Bikes: 2026 पर्यंत 6 नवीन इलेक्ट्रिक बाईक्स येतील


ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांच्या मते, कंपनी 2026 पर्यंत आपल्या 6 नवीन इलेक्ट्रिक दुचाकी सादर करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ओला यावर्षी आणखी एक नवीन स्कूटर सादर करू शकते, 2024 आणि 2025 मध्ये दोन नवीन इलेक्ट्रिक बाईक आणि 2025 मध्येच एक इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते.


Ola Electric Bikes: ADAS तंत्रज्ञान असणार?


मिळालेल्या माहितीनुसार, ओलाच्या आगामी बाईकमध्ये ADAS टेक्नॉलॉजी देखील पाहायला मिळू शकते. याशिवाय आगामी इलेक्ट्रिक बाईकमध्ये तीन रायडिंग मोड आणि फास्ट चार्जिंगची सुविधाही मिळणार आहे. या बाईक्स 150 ते 200 किमीची रेंज देतील. या बाईक्स तुम्ही घरी ही चार्ज करू शकता.


Ola Electric Bikes: 1 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या


आतापर्यंत Ola देशात S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर विकत होती. पण अलीकडेच कंपनीने आपली Ola S1 Air देखील लॉन्च केली आहे. ओला आपली स्कूटर 85,000 ते 1.40 लाख या किमतीत विकते आणि आतापर्यंत सुमारे एक लाख युनिट्स विकल्या आहेत.


RV 400, Revolt RV 300 : या बाईकशी होणार स्पर्धा 


ओलाची आगामी इलेक्ट्रिक बाईक देशातील रिव्हॉल्ट RV 400, Revolt RV 300, One Electric आणि Kabira Mobility KM3000 सारख्या इलेक्ट्रिक बाईक्सशी स्पर्धा करेल.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


Top 8 Safest Cars: 'या' आहेत भारतातील 8 सर्वात सुरक्षित कार, ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5-स्टार रेटिंग


Car loan Information:

Calculate Car Loan EMI