Cng Cars : प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या XL6 आणि Baleno कार सीएनजी प्रकारात लॉन्च केली आहे. कंपनी XL6 S-CNG आणि Baleno S-CNG म्हणून बाजारात विकेल. मारुती सुझुकी बलेनो सीएनजी डेल्टा (MT) मध्ये 8.28 लाख रुपये आणि Zeta (MT) मध्ये 9.21 लाख रुपये किंमतीला आणली गेली आहे. XL6 CNG (Jeta MT) ची किंमत 12.24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.


मारुती बलेनो सीएनजी


Baleno CNG मध्ये 1.2 लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. सीएनजी मोडमध्ये, बलेनो 76 बीएचपी पॉवर आणि 98.5 एनएम टॉर्क जनरेट करेल. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, बलेनो सीएनजी 30.61 किमी/किलो सीएनजीचे मायलेज देईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तर बलेनो पेट्रोल मॉडेलमध्ये 23 kmpl चा मायलेज देते, असा दावाही कंपनीने केला आहे. बलेनो CNG मध्ये 7-इंचाची स्मार्ट प्ले प्रो टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली जात आहे. कंपनी या कारमध्ये 40 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्सला सपोर्ट करते. बलेनोच्या मागील सीट 60:40 मध्ये फोल्ड केल्या जाऊ शकतात. याशिवाय कारमध्ये ऑनबोर्ड व्हॉईस असिस्टंट, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, एमआयडी डिस्प्ले, सीएनजी स्विच बटण, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.


मारुती XL6 CNG


मारुती XL6 चा Zeta मॅन्युअल गिअरबॉक्स प्रकार CNG पर्यायामध्ये आणला गेला आहे. मारुती XL6 मध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर इंजिन आहे. जे CNG मोडमध्ये 87bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, XL6 CNG मोडमध्ये 26.32 किमी/किलो मायलेज देऊ शकते. Baleno CNG प्रमाणे XL6 CNG मध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto, Apple CarPlay आणि कनेक्टेड कार फीचर्स देण्यात आले आहेत. यात क्रूझ कंट्रोल, एलईडी डीआरएल, चार एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड फंक्शन आणि एलईडी फॉग लाईट्स या सारखे फीचर्सही यात देण्यात आले आहे.


देशात बलेनो सीएनजीची टोयोटा ग्लान्झा सीएनजीशी स्पर्धा होणार आहे. तसेच Baleno CNG ची Tata Altroz, Hyundai i20 आणि Honda Jazz शी स्पर्धा होणार आहे. याशिवाय मारुतीच्या पुढील सीएनजी मॉडेलमध्ये ब्रेझा कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे नाव देखील समाविष्ट आहे. जी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ऑफर केलेली पहिली सीएनजी एसयूव्ही असू शकते. मारुती ब्रेझा CNG चे पॉवर आणि टॉर्क आउटपुट एर्टिगा प्रमाणेच असण्याची अपेक्षा आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI